Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाची १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2026 | 12:30 AM
शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती वाढत आहे. अशातच आता पुण्यातून आणखी एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाची १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे.

 

ही घटना २ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवली. ग्रुपमध्ये अ‍ॅड करून घेत त्यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे नफा दर्शवून सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला गुंतवणूक करण्यास सांगितले. तब्बल १७ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांना अटक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

पुण्यातून एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक काम ऑनलाइन पद्धतीने करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी सांगितले. प्रत्यक्षात चोरट्यांनी तरुणाच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला पैस गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी दोन लाख ७१ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: There has been an incident of a young man being cheated after investing in the stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Fraud Case
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
1

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
2

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.