Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Fraud : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; लाखो रुपयांना गंडवले

सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2025 | 01:43 PM
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; लाखो रुपयांना गंडवले

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; लाखो रुपयांना गंडवले

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
  • तब्बल २० लाख रुपयांना घातला गंडा
पुणे : ‘काळ्या पैसे व्यवहारात तुमच्या बँक खात्याचा वापर झाला असून, या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे’, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे डेक्कन जिमखाना भागात राहतात. ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘नरेश गोयल नावाच्या एका व्यक्तीने ५३८ कोटी रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्याने तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. आम्हाला तुमच्या बँकखात्याची तपासणी करायची आहे. याप्रकरणात पोलिसांकडून तुम्हाला अटक होऊ शकेल’, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले.

सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची नऊ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ३४ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहतो. चोरट्यांनी तरुणाला मोबाइलद्वारे संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. सुरुवातीला तरुणाने थोडी रक्कम चोरट्याच्या खात्यात जमा केली. या रक्कमेवर परताव मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. त्यानंतर तरुणाने आणखी रक्कम गुंतवली. तरुणाला परतावा, तसेच मूळ मुद्दल न दिल्याने त्याने नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत.

Web Title: There has been an incident of cheating a senior citizen in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Froud News
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
1

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
2

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
3

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
4

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.