Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…

सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांना गुन्हे दाखल झाल्याचे सांगत त्यांना कारवाईची भिती दाखवत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 12:09 PM
कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्...

कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांना गुन्हे दाखल झाल्याचे सांगत त्यांना कारवाईची भिती दाखवत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. वानवडी तसेच एरंडवणा भागातील ज्येष्ठांना फसविले आहे.

 

पहिल्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांचा गणवेश परिधान करून बृहन्मुंबई पोलिस दलातील अधिकारी असल्याची बतावणी करत १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्यात अटकेची भिती दाखवत त्यांच्यावर दबाव टाकून ही रक्कम उकळली गेली. याप्रकरणी ८६ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली व्यक्ती वानवडी परिसरात राहण्यास असून, ते घरी एकटेच असतात. ते व्यावसायिक आहेत, त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. संबंधिताने तक्रारदारांना पोलिस असल्याची बतावणी केली आणि त्यांना विश्वास बसावा, यासाठी पोलिसांचा गणवेश देखील घातला होता. सायबर चोरट्यांनी त्यांना तुमच्यावर कुलाबा पोलिस ठाण्यात मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कारवाई तसेच अटक करण्याची भिती दाखवली. त्यांच्यावर अटकेसंदंर्भाने दबाव टाकून त्यांच्याकडून जवळपास एक ते दीड महिन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपये घेत त्यांच्या फसवणूक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिकाला पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या संपर्कात असल्याचे सांगत तब्बल २ कोटी १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय ज्येष्ठाने सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व बँक खातेधारकांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल रॉय पसर्नल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया अंधेरी वेस्ट येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांना तुमच्या मोबाईलवरून अश्लील फोटो व व्हिडीओ टाकल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असल्याची बतावणी केली. तर तक्रारदारांना ते पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेशी संपर्कात असून, तुमच्या नंबरवरून दीड कोटींचा फ्रॉड झाला आहे, अशी बतावणी केली. तसेच, त्यांना व पत्नीला प्रेशरमध्ये ठेवत २ कोटी १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

Web Title: There has been an incident of two senior citizens being cheated out of fear of action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.