Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

नेरळ येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच महाविद्यालयातील १९ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2026 | 03:39 PM
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्...; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्...; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

लोणावळा/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील लोणावळ्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नेरळ येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच महाविद्यालयातील १९ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसीफ निसार ठाणगे (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थिनीशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लोणावळ्यातील पवनानगर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन लग्नाचा बनाव रचला. मात्र, काही दिवसांतच आरोपीचे खरे रूप समोर आले. तो आधीच विवाहित असून त्याला चार मुले असल्याचे उघड झाले.

ही बाब समोर आल्यानंतर आरोपीने पीडितेचा मानसिक छळ सुरू केला. “जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल, तर हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारावा लागेल आणि बुरखा घालावा लागेल,” अशी सक्ती आरोपीने केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, पीडितेच्या शिक्षणासाठी मिळालेल्या ४२,००० रुपये शिष्यवृत्तीची रक्कमही आरोपीने हडप केल्याचे समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित विद्यार्थिनीने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक, विश्वासघात तसेच जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार

गोव्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दक्षिण गोव्यातील स्थानिक नगरसेवकाच्या २२ वर्षीय मुलाने तब्बल २५ ते ३० अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर पीडित मुलींचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोव्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित मुलाचे नाव सोहम नाईक असे आहे. पोलिसांनी त्याला रविवारी रात्री अटक केली आहे.

Web Title: There has been an incident where a girl student was trapped in a love trap and forced into marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
1

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
2

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
4

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.