Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी भाई आहे’ म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?

वाईन शॉपबाहेर दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तसेच मी भाई आहे म्हणत परिसरात दहशत पसरवली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 05:43 PM
'मी भाई आहे' म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?

'मी भाई आहे' म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईन शॉपबाहेर दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तसेच मी भाई आहे म्हणत परिसरात दहशत पसरवली. ही घटना गुरुवारी (दि. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक केली आहे.

 

या प्रकरणी रिपन निरन बर्मन (वय २२, रा. शिवशंकर सोसायटी, खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अरविंद गावडे (वय २४), सलमान रहीम नदाफ (वय २४) आणि गुफरान कलीम अहमद (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे वाईन शॉपबाहेर दारू पीत असताना टेबल-खुर्ची बाजूला घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकावत दुकानाबाहेर पडलेल्या काचेच्या बाटल्या त्याच्या अंगावर फेकल्या. यातील एक बाटली फिर्यादीच्या डोक्यात लागल्याने तो जखमी झाला. तसेच आरोपींनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या दिशेनेही काचेच्या बाटल्या फेकल्याने परिसरात घबराट पसरली. आरोपींपैकी एकाने स्वतःला परिसरातील ‘भाई’ असल्याचे सांगत दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना अटक केली असून, अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला

परळी वैद्यनाथ येथील मोंढा मार्केट परिसरातील ‘रिद्धी-सिद्धी’ हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने (कत्तीने) जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शंकरराव शिंदे (वय ५०, रा. वडगाव दादाहरी, ता. परळी) यांचे मोंढा मार्केट येथे ‘रिद्धी-सिद्धी’ हॉटेल आहे. त्यांच्या मुलाचे आरोपी गजानन सुरवसे याच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिनांक २६ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन सुरवसे आणि त्याची आई हॉटेलवर आले. यावेळी गजानन सुरवसे याने सोबत आणलेल्या तीक्ष्ण कोयत्याने शिवाजी शिंदे यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला, डाव्या पायाच्या मांडीला तसेच डाव्या हाताच्या दंडाला गंभीर दुखापत झाली आहे.

Web Title: There has been an incident where a young man was attacked with glass bottles over a minor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू
1

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल
2

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
3

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
4

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.