Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 06, 2025 | 12:49 PM
सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या
  • सिगारेट न दिल्याचा राग अनावर
  • हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कुंदन गायकवाड (२४, रा. अजमेरा म्हाडा, मोरवाडी) आणि अभिषेक दिलीप भोसले (२५, रा. लालटोपी नगर, मोरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर जखमी तरुणाचे नाव मोहमद जाफर अबरार शेख (१८, रा. म्हाडा के-बिल्डिंग, अजमेरा, पिंपरी) असे आहे. संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १) शेख यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हातगाडीवर काम करत असताना आरोपी त्याच्याकडे सिगारेट मागण्यासाठी आले. त्याने नकार दिल्यानंतर आरोपी संतापले. त्यांनी “मी इथला भाई आहे” असे म्हणत त्याच्यावर हल्ला केला. एकाने लाकडी काठीने छातीवर प्रहार केला, तर दुसऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेदरम्यान आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. संत तुकारामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला

पिंपरी शहरातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात शनिवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चॉपरने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यात मुलीचा प्रियकरही आहे. ही घटना हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात तरुणीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे. हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्याचे कारण ‘प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: There has been an incident where a young man working on a handcart was beaten up by two men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
1

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
2

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
3

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार
4

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.