Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या’; वाशी रुग्णालयातील अमानुष प्रकार समोर

शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल २ हजार रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम एक हजार नंतर नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2025 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल २ हजार रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाळीव प्राण्यांनी उकललं खुनाचं गूढ! बेळगावात बकरी आणि कुत्र्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडला खुनी भाऊ

नेमकं काय प्रकार?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपुर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती. रविवारी तिने पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यची महियी मिळताच तिचे आई- वडील उत्तर प्रदेशहुन तात्काळ नवीमुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्याची लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैश्यांची मागणी केल्याचा संतापजनक प्रक्रार समोर आला आहे.

कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो….

शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून प्रथम एक हजार रुपये मागितले होते. परंतु नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली. “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असे म्हणत पैसे उकळले. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात संतापजनक प्रकार, शवागृहामध्ये एका मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी २ हजार रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.#navimumbai #crimenews #Police pic.twitter.com/mDm9JOGKb1 — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) June 17, 2025

या प्रकारावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जवाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या,” असं त्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

पुन्हा एका विवाहितेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळूनच गर्भवती महिलेने संपवलं जीवन

Web Title: They wrap the dead body in cloth properly give 2 thousand inhumane treatment in vashi hospital exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Sucide News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
1

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी
2

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
3

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा
4

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.