बेळगावात एका खुनाचा गुंता सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे.इथे एका मेंढपाळाच्या निर्घृण खुनाचा तपास मानव पुरावे गहाळ असतानाही पाळीव प्राण्यांच्या वागणुकीवरून करण्यात आला. या गुंत्यात जेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, ना मोबाईल लोकेशन, ना सीसीटीव्ही पोलिसांची एकही साधी माहिती उपयोगी आली नाही, तेव्हा खरा शोध बकरी आणि कुत्र्यांनी लावला.
Accident News : मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने 2 जणांना उडवले
नेमकं काय प्रकरण?
बेळगाव जिल्ह्यातील हत्तियालूर गावात राहणारा रायप्पा कामाटी (वय 28) नेहमीप्रमाणे 8 मे रोजी सायंकाळी आपल्या सुमारे 60 बकऱ्यांना घेऊन माळरानावर गेला होता. परंतु तो त्या दिवशी परातलाच नाही. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या आणि त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकलेली होती. शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला बेदम मारहाण झाल्याचा उघड होते. ही बाब पाहता, त्याचा खून अत्यंत योजनाबद्ध आणि निर्दयी पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले.
परंतु हैराण करणारी एक गोष्ट होती की रायप्पा कामाटीचे दोन्ही कुत्रा मृतदेहाच्या शेजारी बसले होते त्याचवेळी सर्व 60 बकऱ्या मात्र स्वतःहून घरी परत आल्या होत्या. हीच गोष्ट सर्वात जास्त हैराण करणारी होती. ही बाब पोलिसांना अत्यंत संशयास्पद वाटली. कारण बकऱ्या मेंढपाळाशिवाय आपोआप कशा परतल्या? कोणी तरी त्यांना परत आणले असावे, असा पोलिसांना दाट संशय आला.
पोलिसांनी एक अनोखा प्रयोग करून पहिला. रायप्पाचा छोटा भाऊ बसवराज याला त्यांनी त्याचा भाऊ रायप्पाचा मृतदेह मिळाला त्याच ठिकाणी तसेच झोपवले. तयच वेळी तेथे बकऱ्या आणि दोन्ही कुत्र्यांना पुन्हा आण्यात आले. बसवराज याच्या शेजारुन हलण्यास बकऱ्या आणि कुत्रे तयार नव्हते. त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. यावरुन हे स्पष्ट झाले की हाच व्यक्ती घटनेदिवशी त्यांच्या सोबत होता आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. हत्यारा रायप्पाचा भाऊच निघाला.
बकऱ्या चरण्यावरून नेहमीच भांडण
तपासात निष्पन्न झाले की रायप्पा आणि बसवराज या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून भांडण सुरु होते. रायप्पाला वाटत होत की त्याच्या लहान भावाने बकरी चरायला न्याव्यात परंतु बसवराजला दुसरे काम करायचे होते. यावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. याच रागातून त्याने आपल्या मोठ्या भावाला रंगाच्या भारत ठार केल्याची कबुली दिली आहे.
मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने शेतकऱ्याचा टोकाचा पाऊल; युवतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल