Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भरदिवसा चोरट्यांचा सुळसुळाट; वृद्धाला एकटे गाठले अन्…

पाषाण परिसरातील साई चौकातून पायी निघालेल्या वृद्धाला गाठून दुचाकीवरील दोघांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2025 | 01:38 PM
फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्...

फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात चोरट्यांचा भरदिवसा सुळसुळाट
  • वृद्धाला एकटे गाठून चैन चोरली
  • पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरु
पुणे : पाषाण परिसरातील साई चौकातून पायी निघालेल्या वृद्धाला गाठून दुचाकीवरील दोघांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. ओळखीचे असल्याचे भासवून दोघांनी ही लुट केली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने तक्रार दिली आहे. रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पाषाण साई चौकाजवळील रोडवर ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनूसार, वृद्ध व्यक्ती पाषाण भागात एका कामानिमित्त फिरत होते. ते मेकओव्हर ब्युटी पार्लरसमोर फुटपाथखाली उभे होते. त्यावेळी समोरून एका दुचाकीवर दोघेजण आले. मागे बसलेला इसम पुढे येऊन वृद्धांच्या गळ्यात हात ठेवून हिंदीत बोलला, ‘क्या अंकल, कितने दिन हो गये मिले नहीं.’ अचानक झालेल्या या वर्तनाने वृद्ध थोडे बुचकळ्यात पडले. त्यांनी त्याला ‘मैं आपको जानता नहीं, आप कौन हो?’ असे विचारले. दरम्यान, दुचाकी चालवणारा गाडीवरुन उतरला आणि तो वृद्धांच्या पाया पडू लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे वृद्ध आणखी चकित झाले.

नंतर या चोरट्यांनी वृद्धांना एक बिस्किटांचे पॅकेट देत ते जवळील बालाजी मंदिरात दान करण्यास सांगितले. वृद्धांनी त्यास नकार दिला, मात्र त्या दोघांनी आग्रहाने पॅकेट त्यांच्या हातात दिले व काही क्षणातच सुतारवाडीच्या दिशेने पळ काढला. सर्व गोंधळात हातचलाखीने वृद्धांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून नेली. वृद्धांना नंतर चोरीचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. बाणेर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Thieves approach elderly man alone in broad daylight in pune and steal his gold chain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Case

संबंधित बातम्या

मोठी बातमी! यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; ED ची छापेमारी, एकास अटक तर…
1

मोठी बातमी! यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; ED ची छापेमारी, एकास अटक तर…

खाकी वर्दीला काळिमा! SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा
2

खाकी वर्दीला काळिमा! SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
3

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…
4

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.