Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरट्यांनी कुरिअर बॉयला मारहाण केली अन् दागिन्यांची बॅग लांबवली; कराड तालुक्यातील घटना

एका कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2025 | 06:43 PM
मालेगावी तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून

मालेगावी तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून

Follow Us
Follow Us:

कराड : राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत एका कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण) असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोल्हापूर येथील कासार गल्लीतील कृष्णा कुरिअरकडून काही सोन्याचा ऐवज मुंबईला पाठविला जाणार होता. कंपनीतील कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हे मंगळवारी रात्री एका बॅगमध्ये तो ऐवज घेवून महामंडळाच्या कोल्हापूर ते मुंबई स्लिपर कोच बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले. बस कोल्हापूर-सातारा लेनवरून मुंबईकडे निघालेली असताना मध्यरात्री एकच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलजवळ थांबली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरले.

कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हेही सोन्याचा ऐवज असलेली बॅग सोबत घेऊन लघुशंकेसाठी उतरले. त्यानंतर ते परत बसमध्ये चढले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडे असलेली सोन्याच्या ऐवजाची बॅग हिसकावून चोरटे तेथून पसार झाले. चोरट्यांनी लांबवलेल्या बॅगमध्ये सुमारे ६५ ते ७० लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेले वीस डबे होते.

घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी राहुल शिंगाडे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीत पोलिसांना त्याच्याकडून त्याच्या अन्य साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

लग्न मंडपाच्या कामाच्या पैशांची चोरी

मालकाची लग्नमंडपाच्या कामाची रोख रक्कम चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार किंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईट्स, शिळफाटा, मुळ रा. पाली, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार दाऊद सय्यद, अमंलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Thieves beat up courier boy and stole a bag of jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Karad Crime

संबंधित बातम्या

दिल्ली विमानतळावर ६८ लाख रुपयांची रोकड जप्त; सीआयएसएफने दोन व्यक्तींना घेतले ताब्यात
1

दिल्ली विमानतळावर ६८ लाख रुपयांची रोकड जप्त; सीआयएसएफने दोन व्यक्तींना घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीवर 4 जणांचा अत्याचार, पन्नास रुपयाचे आमिष दाखवले अन्…; हिंगोलीतील संतापजनक घटना
2

अल्पवयीन मुलीवर 4 जणांचा अत्याचार, पन्नास रुपयाचे आमिष दाखवले अन्…; हिंगोलीतील संतापजनक घटना

Pimpri News : नऊ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; तळेगावच्या मायमर रुग्णालयातील घटना
3

Pimpri News : नऊ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; तळेगावच्या मायमर रुग्णालयातील घटना

खळबळजनक ! 3 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाने केली हत्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केला बनाव
4

खळबळजनक ! 3 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाने केली हत्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केला बनाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.