काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अक्षरा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात १२ वी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. सध्या सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण होणार नाही, आपल्याला अपयश येईल अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. याच मानसिक तणावातून अक्षराने तिच्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबियांच्या निर्दशनास आल्यानंतर तिला तातडीने खाली उतरवण्यात आलं. मात्र तो पर्यंत तो पर्यंत मृत्यू झाला होता.
सुसाईड नोटमध्ये काय?
अक्षराने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवला होता. “आई-बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी गेल्यावर आई-बाबा त्रास करून घेऊ नका…” असे मजकूर तिने लिहिला होता. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना केवळ परीक्षेच्या भीतीमुळे घडली की यामागे इतर काही कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली
एक हृदयद्रावक घटना कल्याण येथून समोर येत आहे. एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्यामुळे भीतीतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली आहे. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आयश विश्वनाथ अमीन (वय 30 वर्षे) असे आहे. आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, B विंगमधील फ्लॅट क्र. 903 मध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते.
Delhi Crime: गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार
Ans: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली.
Ans: बारावीच्या परीक्षेत अपयश येईल या भीतीमुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.
Ans: आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.






