Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयत्याचा धाक दाखवून लूट, दुकानाचीही केली तोडफोड; शिक्रापुरात नेमकं काय घडलं?

कारेगाव (ता. शिरुर) येथील चिंतामणी हॉस्पिटल जवळ एका मनी ट्रान्सफरच्या दुकानात चौघांनी कोयत्याने दहशत माजवत दुकानात तोडफोड करत 35 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 04, 2025 | 03:53 PM
कोयत्याचा धाक दाखवून लूट, दुकानाचीही केली तोडफोड; शिक्रापुरात नेमकं काय घडलं?

कोयत्याचा धाक दाखवून लूट, दुकानाचीही केली तोडफोड; शिक्रापुरात नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : कारेगाव (ता. शिरुर) येथील चिंतामणी हॉस्पिटल जवळ एका मनी ट्रान्सफरच्या दुकानात चौघांनी कोयत्याने दहशत माजवत दुकानात तोडफोड करत 35 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारेगाव (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर डांगे व ऋषिकेश डांगे हे त्यांच्या मनी ट्रान्सफरच्या दुकानात असताना प्रथमेश नवलेसह तिघेजण दुकानात आले त्यांनी ज्ञानेश्वर व ऋषिकेश यांना शिवीगाळ दमदाटी करत दुकानाचे शटर खाली घेऊन दोघांना कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील दरवाज्याची काच व फिंगर प्रिंट घेण्याचे डिवाइस मशीन फोडून नुकसान केले. तसेच कोयता दाखवत दुकानातील ३५ हजार रुपये काढून घेत हातातील कोयता फिरवत दहशत माजवत चौघेजण पैसे घेऊन गेले.

याबाबत ज्ञानेश्वर कान्हू डांगे ‌(वय २१ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे या चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडखे हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामतीतील कोयता गॅंगवर अंकुश; थेट केली येरवडा कारागृहात रवानगी

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसाखाली प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: Thieves have stolen from a shop in shikrapur by showing fear of coyote nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
1

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
2

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
3

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार
4

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.