Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

उत्तर प्रदेशातून दोन तरुण उल्हासनगरमध्ये आले... सोबत होती लाखोंची ‘काळी’ खेप! मात्र, शांतिनगर परिसरात पोहोचताच पोलिसांनी टाकलेल्या सापळ्यात दोघेही अडकले. झडती घेताच तब्बल १५ किलो गांजा सापडला आणि संपूर्ण तस्करीचा प्रकार उघडकीस आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 03:43 PM
Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातून गांजा आणणाऱ्या दोन तरुणांना उल्हासनगरमध्ये अटक
  • १५ किलो गांजा जप्त; किंमत ७ ते ८ लाख रुपये
  • गांजा कोणाला पुरवठा होणार होता? मोठ्या जाळ्याचा पोलिसांकडून तपास
 

उल्हासनगर : उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना सेंट्रल पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे १५ किलो गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ७ ते ८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर हा गांजा नेमका कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सेंट्रल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उतरून दोन्ही तरुण शांतिनगर परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाईची तयारी केली. डीसीपी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शीतल बामणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने शांतिनगर परिसरात सापळा रचला. या कारवाईत दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील झडतीमध्ये सुमारे १५ किलो गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ वीरेंद्र पांडे (२३), रा. देवाईपूर गाव, पोस्ट मथेला, तहसील सकलडीहा, जिल्हा चंदौली आणि आकाश अरविंद साहनी (२५), रा. औरंगाबाद डीहवा गाव, पोस्ट मऊ, तहसील मऊनाथ भंजन, जिल्हा मऊ, उत्तर प्रदेश अशी आहेत.

हेही वाचा: Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

गांजा कोणाला देणार होते?

उत्तर प्रदेशातून आणलेला गांजा उल्हासनगरमध्ये नेमका कोणाला पुरवठा केला जाणार होता, आरोपी शहरात कोणाच्या संपर्कात होते आणि या तस्करीमागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक शीतल बामणे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस कर्मचारी सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि अनिल घुले यांच्या पथकाने सहभाग घेतला.

चौकट, बाइट

सचिन गोरे, पोलिस उपायुक्त :
उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजा आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Ulhasnagar 15 kg ganja seized two arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • crime news
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
1

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
2

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
3

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.