Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरटे जोमात तर पोलिस कोमातच! सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला

गेल्या सहा महिन्यात पुणे शहरातून तब्बल ९८९ वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील केवळ २४२ वाहने शोधण्यात पोलिसांनी यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2025 | 12:51 PM
चोरटे जोमात तर पोलिस कोमातच! सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : दुचाकींच्या शहरातील भयावह चित्र दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चालले असून, पुणेकर आता पोलिसांना आता तरी वाहन चोरांना “आवरा” अशी आर्त हाक मारू लागले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असताना त्या उघड करण्यातही पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ९८९ वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील केवळ २४२ वाहने शोधण्यात यश आले आहे.

पुण्याला सायकलींचे अन् नंतर दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. पण, दुचाकींच्या शहरात वाहन चोरटे जोमात अन् पोलिस कोमात अशी परिस्थिती गेल्या चार ते पाच वर्षांपासून सलग पाहायला मिळत आहे. चोरटे सुसाट सुटलेले असताना पोलिसांना त्यांना आवर घालण्यात काही केल्या यश येतच नाही. सर्वसामान्यांची जीवन वाहनी म्हणून दुचाकीकडे पाहिले जाते. मात्र, त्यावरच चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासोबतच मनस्ताप सहन करावा लागतो. पोलिसांत गेल्यानंतर तत्काळ तक्रार घेतली जातच नाही. आधी वाहन शोध घ्या, मग एक-दोन दिवसानंतर तक्रार दाखल करा, अशी प्रथम सूचना होते.

अनेकवेळा तक्रारदाराच पोलिसांना सीसीटीव्ही आणून देतात. तरीही पोलिस त्याकडे गांर्भियाने पाहत नसल्याचे वास्तव आहे. सर्वसामान्यांना या सर्वांचा त्रास सोसावा लागतो. सार्वजनिक रस्त्यांसह, खासगी पार्किंग व सोसायटींमधून वाहने चोरीला जातात. वाहन चोरांसोबतच आता वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांमुळेही वाहन चालक हैरान आहेत. आधीच गाडी लावलेल्या जागेवर सकाळपर्यंत सुरक्षित राहते का, याचा नेम नसताना आता अचानकच टवाळखोर त्यांची तोडफोड करू लागले आहेत. दिवसाला सरासरी पाच ते सहा वाहने चोरीला जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. त्यावरून शहरातील वाहन चोरीच्या घटनांची तीव्रता लक्षात येईल. त्यामुळे पोलिसांपुढे खर्‍या अर्थाने वाहन चोरांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

घरफोड्या, मोबाईल चोरी, चैन चोरी आणि दुचाकी चोरीची हीच स्थिती आहे. हा आलेख वर्षागणीक वाढत आहे. पोलिसांच्या पुढे चोरटे अन् आपण त्यांच्या मागे, इतकाच तो लंपडाव सुरू आहे. शहर सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून एक सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद होत असले तरी त्यांचा थांगपत्ता लागत नाही.

तीन वर्षांतील वाहन चोरीचा आकडा
वर्ष-       दाखल-   उघड
२०२२-   १,८२५-    ७८७
२०२३-   १९६२-      ५८३
२०२४-   १९१३-      ४१७
२०२५-    ९८९-      २४२

वाहन चोरीविरोधी पथक करतात काय

वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच त्या रोखण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत वाहन चोरीविरोधी पथक आहेत. दोन विभागात दोन स्वतंत्र पथक आहेत. त्याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. त्यांना वाहन चोर शोधण्याचा टास्क आहे. पण, त्यांची कामगिरी सुमारच आहे. अनेक वर्षांपासून ही पथके अधून-मधून एखाद दुसरी कारवाई करतात आणि त्यावरच पथकाची टिमटिमी मिरवतात. त्यांची चमकादर कामगिरी मात्र, काही दिसत नाही.

वाहन चोरीचे गांर्भिय नाही

पुणे शहरातून वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना स्थानिक पोलिसांना त्याचं गांर्भिय नसत, हे अनेक प्रकरणात समोर आले आहे. वाहन चोरीची तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिस तक्रारदारालाच दुश्मन समजून वागणूक देतात, कुठ लावली होती गाडी, कागदपत्रे आहेत का ? कशी गेली, लक्ष ठेवता येत नाही का, दोन ते तीन दिवस आजू-बाजूला शोध घ्या. मिळेल. नाहीच मिळाली तर मग तक्रार दाखल करू अशी उत्तरे मिळतात. त्यावरून पोलिस किती गांर्भियाने अशा घटना घेतात असा प्रश्न आहे.

चोरींचे काही कारणे

  • मौजमाजासाठी वाहन चोरी
  • महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन मुलांचा समावेश
  • तरुणांचे प्रमाण लक्षणीय
  • वाहन चोरीत जुन्या टोळ्यांसह नवनवीन टोळ्या सक्रिय
  • वाहन चोरीनंतर काही तासात त्यां सुट्टयाकडून त्यांची विक्री
  • वाहन चोरीनंतर ग्रामीण भागात या वाहनांची कमी पैशांची चोरी

Web Title: Thieves have stolen many vehicles from pune city in the last six months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Case

संबंधित बातम्या

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले
1

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
2

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले
3

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
4

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.