Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…

संबंधित ई-मेलमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पोस्‍ट ऑफिस लक्ष्य करण्याची धमकी इंग्रजीत देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये काही मजकूर तमिळ भाषेतही लिहिला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2026 | 01:25 PM
पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच...

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच...

Follow Us
Follow Us:

पुणे : पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयासह पुण्यातील स्टेशन परिसरातील जीपीओ पोस्‍ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाला. या मेल येताच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यालयाची कसून तपासणी केली. मात्र, प्राथमिक पाहणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

याप्रकरणी बाणेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहितीनुसार, संबंधित ई-मेलमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पोस्‍ट ऑफिस लक्ष्य करण्याची धमकी इंग्रजीत देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये काही मजकूर तमिळ भाषेतही लिहिला होता. त्यामुळे याकडे सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने पाहत या ई-मेलचा तपास सुरू केला आहे. धमकीची माहिती मिळाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने कार्यालयातील प्रत्येक मजला, प्रवेशद्वार, पार्किंग परिसर तसेच इमारतीतील सर्व संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी केली.

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयलच्या कृत्याची झळ कुटुंबाला? केतन अग्रवाल प्रकरणात व्यवसायावर कारवाईची टांगती तलवार

दरम्यान, कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही धोकादायक वस्तू आढळून न आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सायबर तज्ज्ञांकडून ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला, तो बनावट होता की त्यामागे कोणते मोठे षडयंत्र आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

GPO पोस्ट ऑफिसलाही धमकीचा मेल

पाषाण येथील पासपोर्ट कार्यालयला धकमीचा ई-मेला आलेला असताना स्‍टेशन परिसरातील जीपीओ पोस्‍ट ऑफिसलाही त्‍याच ई-मेलमध्ये धमकीचा उल्‍लेख होता. दोन्‍ही ठिकाणी बॉम्‍ब शोधक नाशक पथकाने केलेल्‍या तपासणीत प्रत्‍यक्षात काहीही आढळून आले नाही.

सिया गोयलच्या कुटुंबियांच्या अडचणींत वाढ

दुसरीकडे, पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येतील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एका मसाल्याच्या आणि सुकामेव्याच्या दुकानाला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कथित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. नियामकाने दुकानाला तात्काळ कामकाज थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Threat to blow up pune passport office and post office with a bomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Bomb threat
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
1

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
2

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
3

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.