Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडणुकीत उभी कशाला राहिली? ताबडतोब माघार घे नाहीतर…’; महिला उमेदवाराला शिवीगाळ करत दिली गेली धमकी

'निवडणुकीत उभी कशाला? ताबडतोब माघार घे नाहीतर मारून टाकीन !' अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरुणीने प्रतिकार करून आरडाओरड सुरू केल्याने आरोपी पळून गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 01:41 PM
महिला उमेदवाराला शिवीगाळ, धमकी

महिला उमेदवाराला शिवीगाळ, धमकी

Follow Us
Follow Us:

अमरावती : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चांदूर रेल्वे शहरात वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आम आदमी पक्षाच्या महिला उमेदवाराला घरात शिरून शिवीगाळ, छेडछाड आणि जीवघेण्याची धमकी देण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.27) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.

चांदूर रेल्वे पोलिसांना तक्रार मिळताच रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी रवी रामचंद्र कातोरे (रा. चांदूर रेल्वे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. चांदूर रेल्वेतील ही घटना केवळ एक उमेदवारावरील हल्ला नसून निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली असली तरी या घटनेमुळे निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण झाले आहे. तक्रारकर्ती तरुणी ही चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगरसेवकपदासाठी उभी आहे.

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी रवी कातोरे याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत. या घटनेनंतर चांदूर रेल्वे शहरात मोठी चर्चा सुरू आहे. तरुणीला घरात घुसून धमकावणे हा निंदनीय, भ्याड आणि राजकीय दडपशाहीचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

हेदेखील वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान

विविध प्रकारे टाकला जात होता दबाव

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिच्यावर विविध प्रकारे दबाव टाकत असल्याची माहिती मिळते. गुरुवारी रात्री पक्षाची टांगा गल्ली येथील प्रचारसभा संपवून ती घरी परतली. त्यावेळी तिचे आई-वडील व बहीण हे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. घर उघडून आत जाताच त्याक्षणी आरोपी मागून घरात शिरला आणि वाईट उद्देशाने तिचा हात पकडून शिवीगाळ करत धमक्या दिल्या. ‘निवडणुकीत उभी कशाला? ताबडतोब माघार घे नाहीतर मारून टाकीन !’ अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरुणीने प्रतिकार करून आरडाओरड सुरू केल्याने आरोपी पळून गेला.

हेदेखील वाचा : Raigad News: कर्जतमधील रखडलेली विकासकामं लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

Web Title: Threatening and abusing a female candidate in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Amravati News
  • crime news

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.