Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai Crime: दारू पीत बसले, मस्करी झाली अन् डोक्यात…; अवघ्या 4 तासात पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरुणकुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2025 | 08:38 PM
Wai Crime: दारू पीत बसले, मस्करी झाली अन् डोक्यात…; अवघ्या 4 तासात पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

वाई: वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांमध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजली आहे. वाई शहरातील सोनगिरीवाडी येथील।बाभळवनात राज अरुणकुमार सिंग, आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, (वय २५),।शाकीरखान (वय २५) असे तिघेजण हे दारू पिण्यासाठी बसले होते. याचवेळी शाकीर राज,व प्रणित यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद बघता बघता विकोपाला गेला आणि त्या रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या.

त्यानंतर शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली.विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.या मारहाणीत राज हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता.त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनीसिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला अॅम्बुलन्स मधून वाईच्या ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हेही वाचा: तळसंदे येथे शस्त्राचा धाक दाखवून चोरी; 18 तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड लंपास

प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरुणकुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिली. त्या तक्रारीच्या आधारे परिविक्षाधीन डिवायएसपी श्याम पानेगावकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास वाईचे डिबी प्रमुख असलेले सुधीर वाळुंज, हवलदार मदन वरखडे, प्रसाद दुदुस्कर,श्रावण राठोड, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, धिरज नेवसे, विशाल येवले, राम कोळी, नितीन कदम,रुपेश जाधव, गौतम दाभाडे या पथकाला बोलावून वाई शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांनवर सापळे लावण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: Encounter म्हणजे काय? पोलिसांना कधी परवानगी मिळते? वाचा सविस्तर….

वरिष्ठांच्या सुचनेनुसार या पथकाने मांढरदेव घाट, परखंदी घाट अशा ठिकाणचे डोंगररांगा रात्रभर पिंजून काढल्या पण आरोपी काही हाताला लागत नव्हते. दरम्यान पहाटे घाटात फिरायला येणाऱ्या लोकांना सुधीर वाळुंज यांनी आरोपींचे फोटो दाखवले असता, ते परखंदी घाटाने गेले असल्याचे समजले. अखेर या टिमने डोंगररांगामध्ये लपून बसलेल्या आरोपींना अथक परिश्रम घेवून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अवघ्या चार तासातच गजाआड केले. वाई तालुक्यातील नागरिकांसह जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी वाईच्या डिबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे. या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत.

Web Title: Three friends drinking liquor then dispute killed his friend by smashing a beer bottle on his head wair crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 08:38 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • police
  • Wai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत
1

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…
2

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Chandrapur Crime: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत
3

Chandrapur Crime: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले
4

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.