Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

कोयते उगारून आरोपींनी दहशत माजवली. प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांना साथ देऊ नका. तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 12:30 PM
Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : विश्रांतवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. या हत्येनंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजवल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत ही घटना घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

विश्रांतवाडी भागात मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. तेलंगी याचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजवली. प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांना साथ देऊ नका. तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar : हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…

त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजवली. नागरिकांना शिवीगाळ करुन पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

सांगलीतही भयंकर हत्याकांड

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी घडलेल्या निर्घृण हत्यांनी सांगली हादरून गेली आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत उघडपणे सांडलेल्या रक्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

सुरक्षित कोण? नागरिकांचा संतप्त सवाल

दिवसाढवळ्या रक्तपात होत असल्याने “सामान्य माणूस सुरक्षित आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. किरकोळ कारणांवरून होणाऱ्या जीवघेण्या घटना आणि वाढती गुन्हेगारी यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी, या सलग हत्याकांडांचा छडा लावणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे तपास यंत्रणांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.

Web Title: Accused terrorize with raised sickles after committing murder in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • crime news
  • Murder Case
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
1

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
2

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
3

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
4

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.