Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime : बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड; गच्चीवर झोपलेल्या आईसह दोन मुलांची तलवारीने निर्घृण हत्या

गंभीर जखमी झालेला शिवराय जीव वाचविण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तेथेच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.

  • By anuradha sagar
Updated On: May 02, 2026 | 05:17 PM
सोलापूर क्राईम, बोरामणी हत्याकांड, Breaking News, Crime News, Triple Murder,

सोलापूर क्राईम, बोरामणी हत्याकांड, Breaking News, Crime News, Triple Murder,

Follow Us
Follow Us:
  • गरमीमुळे तिघेही गच्चीवर झोपले होते.
  • मध्यरात्री १२ च्या सुमारास अज्ञात इसमाने तलवारीने हल्ला
  • गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू
Solapur Crime News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nasrapur crime News: खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार! पोलीस अधीक्षक संदीप गील यांची नसरापूरकरांना ग्वाही

पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट देत परिसराला बॅरिकेडिंग करून बंदोबस्त वाढविला आहे. बोरामणी येथील मस्के कुटुंबाची सलग तीन घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची बारावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि दहावीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के (वय १६) हे तिघेजण राहत होते. गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीने सपासप वार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला शिवराय जीव वाचविण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तेथेच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

Nasrapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचारानंतर भोर तालुक्यात जनक्षोभ; पुणे-सातारा महामार्ग रोखला

जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता

पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ते सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह स्वतःच्या घरात राहत होत्या. शेजारी त्यांचे सख्खे दीर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. घर, शेतजमीन आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Pune Crime : मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

 

 

Web Title: Triple murder shakes solapur mother and two minor children hacked to death in boramani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Murder News
  • Solapur Crime
  • Solapur Police

संबंधित बातम्या

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप
1

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.