Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्…

चार-पाच दिवसांपूर्वी याच भागातील प्रज्वल तायडे या तरूणाचा घरात शिरून खून करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हा पुन्हा हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2026 | 09:07 AM
अल्पवयीन मुलीवर केला दोघांनी जीवघेणा हल्ला

अल्पवयीन मुलीवर केला दोघांनी जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:

दर्यापूर : दर्यापूरमधील आनंद नगर भागात अल्पवयीन मुलगी घरात असताना तिच्या घरात शिरून दोन अनोळखी भामट्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चार-पाच दिवसांपूर्वी याच भागातील प्रज्वल तायडे या तरूणाचा घरात शिरून खून करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हा पुन्हा हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे अल्पवयीन मुलगी ही हत्या झालेल्या तरुणाच्या घराजवळ राहते. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आनंद नगर येथील कुटुंब घरात असताना दोघांनी घरात प्रवेश करत मुलीवर चाकूने हल्ला केला. यावेळी त्या मुलीने थोडा प्रतिकार केल्याने वार चुकला. या गोंधळात हल्लेखोर पसार झाले. याबाबत दर्यापूर पोलिसात तक्रार देण्यात आली असून, हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दर्यापूर पोलिसांनी तातडीने वाहन पाठवून हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, या घटनांचा आढावा घेतला तर खून, दगडफेक, महिला अत्याचार, मारहाण आदी घटना शहरात घडल्या. यात विशेषतः तरुण सहभागी असल्याचे दिसून आले. आजकाल व्हॉट्सऍप, फेसबुक आणि सोशल मीडिया वापरताना हे तरूण क्राईम स्टोरी बघत क्रूर बनत असल्यामुळे अशा घटना घडत आहे का? असा सूर उमटत आहे. यांसह दर्यापूर बनोसा बाभळी भागात तरूणांच्या काही टोळ्या निर्माण झाल्याचे सुद्धा सांगण्यात येते.

सोशल मीडिया ठरतोय कारणीभूत?

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण कोणाचे मार्गदर्शन घेतात? की त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पोलिसांच्या विभागामार्फत यावर काटेकोर लक्ष दिले तरच पुढील काळ सुरक्षित राहाणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

किरकोळ वादानंतर तरुणाची थेट हत्याच

दुसऱ्या एका घटनेत, लग्नसमारंभात डीजेच्या तालावर नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षांत झाले. अचलपूर-चांदूर बाजार रस्त्यावर धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी अद्याप पसार आहेत.

लग्नसमारंभात नाचण्यावरून झाला वाद; किरकोळ वादानंतर तरुणाची थेट धारदार शस्त्रांनी हत्याच

Web Title: Two youth life threatening attack on minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Attempt to Murder
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
3

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
4

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.