डीजेच्या वादात तरुणाची हत्या
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात लग्नसमारंभात डीजेच्या तालावर नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षांत झाले. अचलपूर-चांदूर बाजार रस्त्यावर धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी अद्याप पसार आहेत.
राजेश सिंग बावरी (वय २८, मोर्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे आहे. तर त्याचा भाऊ अशोक उर्फ गोलू सिंग बावरी (वय ३२, पापड) गंभीर जखमी असून, त्याच्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी घडली. परतवाडा येथील संतोष सिंग भोंड यांच्या लग्नसमारंभात सकाळी डीजेवर नाचताना दोन गटात किरकोळ वाद झाला होता. दोन्ही गट परतवाडा पोलिस ठाण्यात पोहोचले; मात्र नंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. तरीही सकाळच्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी सायंकाळी सूड उगविल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात
सायंकाळी सुमारे ५ वाजता राजेश आणि त्यांचा भाऊ अचलपूर फाटा मार्गे मोर्शीकडे दुचाकीवरून जात होते. अचलपूर नाका-चांदूर बाजार मार्गावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर राजेश यांना खाली पाडून १० ते १२ जणांनी धारदार शस्त्रांनी वारंवार हल्ला केला. दोन्ही जखमींना प्रथम अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावतीला हलविण्यात आले.
हवेत गोळीबारीचीही परिसरात चर्चा
दरम्यान, हल्ल्यात गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. बिजल सिंग बावरी, नाना सिंग बावरी, अमन सिंग बावरी, वीरू सिंग बावरी, कालू सिंग बावरी, चरण सिंग बावरी यांच्यासह इतर आरोपी पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी अचलपूर पोलिस, ग्रामीण एलसीबी व गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.
पुण्यात टोळीयुद्ध भडकतंय
वनराज आंदेकर याचा खून सोमनाथ गायकवाड टोळीकडून १ सप्टेंबर २०२४ रोजी झाला होता. टोळी युद्धाच्या संघर्षातून हा खून झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. नंतर आंदेकर टोळीकडून दोन खून घडवून आणले. नंतर आता तिसऱ्या खूनाचा प्रयत्नात अक्षय मस्के याच्यावर गोळीबार व तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर आरोपी पसार झाला होते.






