सकाळच्या नाश्त्यात प्रत्येक घरात ब्रेड बटर कायमच असते. ब्रेड बटर खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. पण बऱ्याचदा ब्रेड शिल्लक राहिल्यानंतर काही लोक फेकून देतात. मात्र असे न करता ब्रेडपासून तुम्ही अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला ब्रेडपासून कोणते टेस्टी आणि गोड पदार्थ बनवले जातात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही बनवू शकता. (फोटो सौजन्य – istock)
शिल्लक राहिलेला ब्रेड फेकून देण्याचा विचार करत असाल तरच थांबा! झटपट बनवा 'हे' चविष्ट पदार्थ

मॉलमध्ये गेल्यानंतर आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गार्लिक ब्रेड. हा ब्रेड तुम्ही घरी सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. लसूण आणि बटरचे मिश्रण तयार करून ब्रेडवर लावून त्यावर चीज टाका.

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही ब्रेड पुडिंग बनवू शकता. अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून पुडिंग बनवले जाते. व्हॅनिला एसेन्सच्या मिश्रणात ब्रेडक्रम्स भिजवत ठेवून ते नंतर बेक करून घ्या. शुगर सिरप टाकून ब्रेड पुडिंग सर्व्ह करा.

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कायमच काय बनवावे सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये शाही तुकडा तुम्ही बनवू शकता. शाही तुकडा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

सूप पातळ झाल्यानंतर ते घट्ट करण्यासाठी ब्रेडचा वापर केला जातो. याशिवाय भाजलेले ब्रेड तुम्ही सूपमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता.

ब्रेड शिल्लक राहिल्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ब्रेड पकोडा, ब्रेड टिक्की किंवा ब्रेड कटलेट बनवू शकता. हे पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतील.






