Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच; नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

उल्हासनगर शहरात CBI अधिकारी बनून सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये ठकवणाऱ्या एका भामट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 02:43 PM
Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच;  नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद
Follow Us
Follow Us:
  • नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच
  • नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद
उल्हासनगर :  महिलांना आणि तरुणींना नोकरीचं आमीष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं या घटनेने नाशिक हादरुन गेलं. कॉर्पोरेट ऑफिसच्या नावाखाली तरुणीना नोकरीला लावून त्यांचं बळजबरीने धर्मांतर केलं जात होतं. हे सगळं रॅकेट बाहेर पडलं आणि मोठ्या गुन्हाचा उलगडा झाला. अशातच आता नाशिकच्या या घटनेनंतर उल्हासनगर शहरात देखील नोकरीचं आमीष दाखवून लुटणाऱ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

उल्हासनगर शहरात CBI अधिकारी बनून सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये ठकवणाऱ्या एका भामट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा भामटा कमरेला नकली पिस्तूल लटकवून आणि CBI चा बॅच दाखवत फिरायचा. या बनावट अधिकाऱ्याचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संशय आणि त्यांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला पकडण्यात यश आले. हा संशयित उल्हासनगरमध्ये CBI अधिकारी बनून फिरत होता. तो स्वतःला उच्च पदावर असल्याचे सांगून लोकांना CBI मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत होता. अनेक लोक त्याच्या बोलण्याला भुलले आणि त्याला लाखो रुपये दिले.

दुकानातील ‘चेंजिंग रूम’मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

आपले बनावट रूप खरे वाटावे यासाठी तो नेहमी CBI अधिकाऱ्यासारखे कपडे घालत असे आणि सोबत नकली पिस्तूल ठेवत असे. परिसरात चर्चा होती की हा बनावट अधिकारी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या संपर्कात होता. फसवणूक झालेल्या काही लोकांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सोनू आणि मोनू पवार यांच्याकडे जाऊन आपली तक्रार मांडली. फसवणूक झालेल्या महिलांनी त्याला चांगलाच चोपही दिला. पवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता समोर आलेली व्यक्ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री या बनावट अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Nashik Conversion Racket: टार्गेट ‘फिक्स’ अन् पुढचं नियोजन व्हॉट्सॲपवर! नाशिकच्या MNC कंपनीतील ‘कट्टरतेचा’ भयानक पॅटर्न उघड

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने लोकांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली असून लेखी स्वरूपात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप फसवणूक झालेल्या एकाही व्यक्तीने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

Web Title: Ulhasnagar crime fake pistol and fake cbi batch a fraudster who embezzled lakhs in the name of job arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime news
  • navrashtra news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
1

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
2

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम
4

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.