ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या नवविवाहितेचं नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय 21) असं आहे. वैशालीचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील देवराम नगर येथे राहणारे विजय काशिनाथ पाटील यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नाला अवघे सहा दिवस झाले होते. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मांडव परतणीचा विधी आणि माहेरी जाण्यासाठी वैशालीचे काका तिला घेण्यासाठी जळगावला आले होते.
लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार असल्याने वैशाली खूप आनंदात होती. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर ती काका प्रवीण सूर्याजी पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथे जाण्यासाठी निघाली. मात्र हा आनंदाचा प्रवास काही अंतरातच दुर्दैवी ठरला.
दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला असून, या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
Ans: वैशाली भाऊसाहेब पाटील.
Ans: जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर.
Ans: अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.






