
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील मऊरानीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे दुःखी झालेल्या एका पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार करत गंभीर आरोप केले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव डालचंद्र अहिरवार असे आहे. या व्यक्तीने पत्नीच्या फसवणुकीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
Madhya pradesh crime: आधी नवजात बाळाची हत्या, नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर…,नेमकं प्रकरण काय?
व्हिडिओत काय?
डालचंद्र अहिरवार याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता. त्याने व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे, माझ्यासारखा विश्वासघात कोणालाही सहन करावा लागू नये. मला मरायचे नव्हते. पण नाईलाज आहे. मी खूप दुखावला गेलो आहे. मना पासून ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच फसवले असे त्यांनी म्हंटले आहे.
मृतकाच्या मामेभावाने काय सांगितले?
मृतकाच्या मामेभावाने दिलेल्या माहितीनुसार, डालचंद्र अहिरवार यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. त्यांना 8 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी आहे. डालचंद्र हे खासगी नोकरीसाठी हरियाणातील बहादूरगढ येथे पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. डालचंद्र यांना काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे घरमालकासोबत प्रेमसंबंधात असल्याचे समजले. याला विरोध केल्यावर पत्नीने त्यांना त्याच व्यतींकडून मारहाण करवून घेतली. मोबाईलही काढून घेतला. यानंतर डालचंद्र गावात परतले. तर त्यांची पत्नी माहेरी निघून गेली. डालचंद्र यांनी पत्नीच्या नावावर खरेदी केलेली जमीन ती विकण्याचा विचारात होती. याला पत्नीच्या कुटुंबानेही पाठिंबा दिला. या सर्व गोष्टींमुळे व्यथित होऊन डालचंद्र यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
पत्नीच्या भावाचा वेगळा दावा
डालचंद्र यांच्या पत्नीच्या भावाने वेगळाच दावा केला आहे. डालचंद्र दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा आणि त्यामुळेच त्यांच्यात वाद होता. पत्नीचे कोणाशीही प्रेमसंबंध नव्हते, हा खोटा आरोप आहे. असे सांगितले.
कोणतीही तक्रार दाखल नाही
डालचंद्र यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा विष प्राशन केले. त्यांना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मऊरानीपूर पोलीस स्टेशनच्या स्टेशन इंचार्ज मुकेश कुमार सोळंकी यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले आहे. व्हिडिओबद्दल कोणतीही माहिती किंवा तक्रार (FIR) प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. तक्रार मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे.