जुन्या मालकाकडून खंडणी मागणी
टेक्निकल तपासात आरोपी सापडला
आरोपी अटकेत
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या आधीच्या मालकाकडून ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बातमी समोर आली आहे. या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रमजान अली हाशमी (३२) असे सांगितले आहे. तो दिल्लीच्या दक्षिणेकडील छतरपुर परिसरातील रहिवासी असल्याचं सांगितले जात आहे.
बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
काय आहे नेमकं प्रकरण?
पहाडगंजच्या मोतिया खान परिसरात राहणाऱ्या मनोज कुमार कश्यप याने 26 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार करतांना सांगितले की,10 ऑक्टोबरपासून त्याला आणि त्याच्या पत्नीला धमकीचे कॉल आणि मॅसेज येत होते.
तर घडलं असं, कश्यपच्या पत्नीला आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल आला होता. त्यानंतर, त्या नुंबरवरून सतत मॅसेजेस येण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये, कुटुंबीय सुरक्षित हवे असतील तर, ४० लाख रुपये द्यावे लागणार असे मनोज कुमारला सांगण्यात आले. काही दिवसांनंतर, मनोजला सुद्धा वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे कॉल आणि मेसेजेस येऊ लागले. कश्यपने सावधगिरी बाळगतात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कशी केली अटक ?
तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनतर पोलिसांनी टेक्निकल तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी त्या व्हॉट्सअॅप नंबरशी संबंधित आयपी अॅड्रेस ट्रेस केला आणि यामुळे आरोपींचं लोकेशन समोर आलं. हे सर्व कॉल्स छतरपुर येथून केले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्या ठिकाणी छापे टाकले आणि आरोपी रमजान अली हाशमीला तिथून अटक करण्यात आली.
गुन्ह्याची दिली कबुली
आरोपीने चौकशीदरम्यान गुन्हा कबुल केला. आरोपीने सांगितले की तो पूर्वी मनोज कुमारच्या नरैना येथील फॅक्ट्रीमध्ये करत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे मनोजचे कुटुंबीय आणि त्याच्या व्यवसायाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती. आरोपीवर कर्ज होतं आणि लग्नाचा खर्च पूर्ण करण्यासाठी त्याने हे बनावट नंबरच्या माध्यमातून हा गुन्हा घडवून आणला. पोलिसांनी आरोपी रमजानकडून फोन आणि लॅपटॉप जप्त केल्याची माहिती आहे. याच उपकरणांच्या आधारे, आरोपी बनावट आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आणि मॅसेजेस करत होता. पोलिसांनी धमकी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली प्रकरणातील आरोपीविरुद्ध पहाडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






