Phaltan Suicide Case: फलटण आत्महत्या प्रकरण; डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या खासदाराचे नाव?
Phaltan Doctor Women Suicide Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठ आणि राजकीय दबाव आल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता. त्यासाठी एका खासदाराच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता.
या प्रकरण समोर आल्यानंतर आज या प्रकरणातील एका आरोपीला अटकही करण्यात आली. पण त्याचवेळी महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी कोणत्या खासदाराकडून दबाव टाकला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यात ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
जागतिक दबावांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, आयएमएफचा विश्वास कायम
अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित निबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे आमदार सचिन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या तिघांकडून इथली यंत्रणा चालवली जाते, हे तिघेजण चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, महाडिक नावाचे पोलीस निरीक्षकाचाही समावेश असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, “फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. यात महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पण 15 दिवसांपूर्वीच महाडिक याची नंदुरबारला बदली करण्यात आली. महाडिक यांच्याकडेच संबंधित पीडित महिला डॉक्टरने तक्रार अर्ज केला होता. पण तिची ती तक्रार त्याने केराच्या टोपलीत टाकली. “त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. जर त्याने त्या वेळीच संबंधित अर्जाची दखल घेतली असती, तर आज तिचा जीव वाचला असता.”
अंबादास दानवे म्हणाले, “माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेणे हा त्याचा धंदा झाला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन कांबळे पाटील यांची साथ आहे. निंबाळकरचं अधिकाऱ्यांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर तात्काळ कारवाई करावी,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.






