Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; ‘या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्या कथित ध्वनीफीत प्रकरणात भाजपचा माजी महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय वसंत चौधरी याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2026 | 03:15 PM
व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; 'या' तारखेपर्यंत पोलिस कोठडी

व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; 'या' तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Follow Us
Follow Us:

नंदुरबार : राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्या कथित ध्वनीफीत प्रकरणात भाजपचा माजी महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय वसंत चौधरी याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने धुळे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुरुवारी रात्री वैद्यकीय तपासणीनंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व जातीवाचक स्वरूपाचे संभाषण केल्याचा आरोप करत त्यांचे चुलत भाऊ रोहन शरद गावित यांनी नंदुरबार शहर (उपनगर) पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये फिर्याद दिली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली. या गुन्ह्यांनंतर चौधरी काही दिवसांपासून फरार होता. सध्या डॉ. हिना गावित, रक्षा खडसे, मालती वळवी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संबंधित कथित ध्वनीफीत प्रकरणांतील गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही अटक करण्यात आली असून, पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

रोज नव्या क्लिप्स

नंदुरबारमध्ये दररोज नव्या कथित ध्वनीफिती व्हायरल होत असून त्यातील संभाषणांमुळे अनेकांची बदनामी होत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात चौधरीविरुद्ध आतापर्यंत सुमारे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. कथित ध्वनीफितींमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री रक्षा खडसे, आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी व अमरीश पटेल तसेच इतर राजकीय नेत्यांशी संभाषण असल्याचा दावा आहे. मात्र, या सर्व ऑडिओ क्लिप्स कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे छेडछाड करून तयार करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी आणि संबंधित नेत्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

Web Title: Vijay chaudhary has been arrested in connection with the viral audio clip case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • BJP
  • crime news

संबंधित बातम्या

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
1

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
2

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
3

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
4

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.