Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…

ड्रग्ज फ्री सिटी करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असताना ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कारखाना थाटण्याचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 11:32 AM
ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल...

ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे : ड्रग्ज फ्री सिटी करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असताना ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कारखाना थाटण्याचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ४५ लाखांच्या एमडीसह १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महागड्या चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. वाघोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

याप्रकरणात अनिस शम्मू सय्यद (वय २८, रा. मांजरी बुद्रुक), हरी उत्तम उफाडे (वय ३५, रा. वाघोली), सुमित अशोक घुले (वय ४१), प्रतिक उर्फ सोन्याबापु होले (वय ३२, लोणीकंद), ऋषीकेश अंकुश उर्फ राम यनभर (वय २९,रा. शिरूर) तसेच रामनिवास रानुराम बिश्नोई (वय २५, रा. मुंढवा), आकाश अशोक ढवळे (वय २६) व विपीनकुमार श्रीरामसागर पंडीत (वय ५४, रा. अंधेरी पुर्व ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड तसेच सहाय्यक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

गेल्या महिन्यात अनिस व हरी उफाडे यांना एमडी विक्री प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या तपासातून सुमित घुले, प्रतिक होले व ऋषीकेश यांना देखील लागलीच पकडले होते. नंतर वाघोली पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत रॅकेटचे जाळे समोर आणले. मुख्य सूत्रधारापर्यंत धागेदोरे पोहोचवले. या प्रकरणात सुमित घुले हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. तो आकाश ढवळे याच्यासोबत शहरासह लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव आदी ग्रामीण भागात एमडीची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान आरोपी अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आला. त्याच्यासह अन्य आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ लाख रुपयांच्या एमडीसह बीएमडब्ल्यू, स्विफ्ट, ग्लान्झा यांसारख्या महागड्या वाहने असा १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

कारखाना सुरू करण्याची तयारी

मुख्य सूत्रधार सुमित घुले हा विपीनकुमार पंडीत याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी तयार करण्यासाठी कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे तपासातून समोर आले. त्यानंतर लागलीच पोलिसांनी विपीनकुमार याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. सुमित घुले याला रामनिवास बिश्नोई एमडी हा अमली पदार्थ देत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बिश्नोई याला देखील अटक केली. विपीनकुमार हा २०१६ मधील ग्रामीण भागातील एनडीपीएसच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. नंतर तो मुबंईत स्थलांतरीत झाला होता. त्याला हडपसरमधून पकडण्यात आले आहे.

Web Title: Wagholi police bust drug racket arrest accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • crime news
  • Drugs Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.