Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास 'एसआयटी' चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ
या घडामोडींनंतर आता त्यांच्या चौकशीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. अशातच रविवारी (10 मे) एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशोक खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या ..
दरम्यान,यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. अशोक खरातने पतसंस्थेत उघडलेल्या कथित बोगस खात्यांच्या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसआयटी चौकशीदरम्यान त्यांनी नेमकी कोणती माहिती दिली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
रुपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीत आपली भूमिका स्पष्ट करताना, माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून आध्यात्मिक श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरू मानले होते, असे सांगितले. माझे आणि अशोक खरात यांचे कोणतेही आर्थिक संबंध नव्हते. तसेच खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केलेला नाही, असेही त्यांनी चौकशीत नमूद केले.
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड
यावेळी अशोक खरात यांची दुसरी बाजू किंवा त्यांच्यावरील आरोपांची माहिती मला नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकर यांनी एसआयटीसमोर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी, “चौकशीत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरं दिली आहेत. माझ्या उत्तरांमुळे तपास यंत्रणेचं समाधान झालं असेल, असा मला विश्वास आहे,” असे सांगितले.
तसेच, “पोलिसांना तपासात जसं सहकार्य अपेक्षित असेल, तसं पूर्ण सहकार्य मी करणार आहे. तपासासंदर्भात सविस्तर चर्चा तपास यंत्रणेसोबत झाली असून, चौकशीचा अहवाल पुढे समोर येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.






