Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime: क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल

वर्ध्यातील हिंगणघाट येथे विवाहित महिलेचा पती आणि सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी पतीने पत्नीचे खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ नातेवाईक व मित्रांना पाठवत तिची बदनामी केली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 03:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ.
  • पतीने पत्नीचे खाजगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.
  • हिंगणघाट पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत संतापजनक घटना घडली आहे. तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित २८ वर्षीय तरुणीच्या सासरच्यांनी तिच्याकडे अधिक पैशांसाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. जेव्हा तिने हे करण्यास नकार दिला तेव्हा, तिची शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. हा त्रास तिने आपल्या आई वडिलांना सांगितला तेव्हा कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणाताही परिणाम झाला नाही, त्यांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले होते. यांनतर सासरच्या मंडळींनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

माहेरी नेऊन सोडले आणि…

दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रयत्न वाढू लागले. यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेला लाथा आणि ठोसे मारून निर्दयपणे मारहाण केली. नंतर डिसेंबर 2025 रोजी, आरोपी नवऱ्याने पीडितेला जबरदस्ती करत मामाच्या घरी नेले आणि तिथेच सोडून दिले. या घटनेला बराच वेळ लोटून गेल्यानंतर आरोपी नवऱ्याने पत्नीची विचारपूस करण्यासाठी साधी माहेरी भेट देखील दिली नाही. एवढेच नाही तर सन्मानाने घरी आणण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही.

आक्षेपार्ह व्हिडीओ समोर

हा छळ इथेच नाही थांबला, क्रूरतेची सीमा वाढत गेली. त्याने आपल्या मोबाईलच्या फोनमध्ये असलेले काही खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर नातेवाईक आणि निवडक मित्रांना पाठवली. या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिला पूर्णपणे खचून गेली. पीडितेने ६ जून रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

गुन्हा दाखल

पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत हिंगणघाट पोलिसांनी तात्काळपणे आरोपी नवरा आणि इतर पाच नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंडाबळी आणि मारहाण आणि सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केली जात आहे.

Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली.

  • Que: आरोपी पतीने काय कृत्य केले?

    Ans: आरोपी पतीने पत्नीचे खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ नातेवाईक व मित्रांना पाठवले.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी पती आणि इतर पाच नातेवाईकांविरुद्ध हुंडा, मारहाण आणि सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Wardha crime the height of cruelty harassment and assault over dowry after abandoning his wife at her parents home he circulated private videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • crime
  • wardha
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम
1

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा करण्याचे पोलिस प्रशासनाचे गुंतवणूकदारांना आवाहन
2

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा करण्याचे पोलिस प्रशासनाचे गुंतवणूकदारांना आवाहन

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
3

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
4

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.