Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नवी मुंबई हादरली! सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर-१५ मध्ये एका अज्ञात तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. डीमार्टजवळ अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून एनआरआय पोलीस तपास करत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 07:20 PM
Crime News: नवी मुंबई हादरली! सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह
Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई हादरली!
  • सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या
  • अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह
सावन वैश्य | नवी मुंबई: सीवूड सेक्टर-१५ येथील आरुष हॉटेलसमोरील डीमार्टलगत एका अज्ञात तरुणाची डोक्यावर घातक वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा तरुण पदपथावर आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास सीवूड सेक्टर-१५ परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एनआरआय सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मृत तरुणाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव आढळून आले. प्राथमिक तपासात जड वस्तूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या चौकशीत संबंधित तरुण हा परिसरातील एका पडीक इमारतीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्या इमारतीत पोलिसांना त्याचा पांढरा शर्ट सापडला. शर्टच्या खिशाची झडती घेतली असता अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरले जाणारे व्हाइटनर आढळून आले. त्यामुळे तो नशेच्या आहारी गेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचा आणि हत्येचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

हत्या घटनास्थळीच झाली की अन्यत्र करून मृतदेह तेथे आणण्यात आला, याचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे तसेच एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी भेट देऊन फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांची चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील काही पडीक इमारती आणि ओसाड जागांवर नशेखोरांचा वावर वाढल्याच्या तक्रारी यापूर्वीही स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर अशा ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढविणे, सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आणि बेकायदा वास्तव्यास आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा पुढे येत आहे. एनआरआय सागरी पोलीस मृत तरुणाची ओळख पटविणे, हत्येमागील नेमका हेतू आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Web Title: Navi mumbai seawoods murder unidentified youth killed near dmart nri coastal police investigation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
1

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
2

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
3

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
4

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.