Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

एप्रिल २०२४ मध्ये ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी ५ एप्रिल, ६ एप्रिल आणि ७ जुलै २०२४ रोजी मिळून ३७.५० लाख रुपये रोख दिल्याचा दावा केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2026 | 12:20 PM
व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : सदाशिव पेठ भागात हॉटेलच्या केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून 37 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश खाशाबा नलावडे (वय ५३), उमाकांत रामचंद्र वालगुडे (वय ५६), दिपक केशवराव धुमाळ (वय ६५, तिघेही रा. कोथरूड, पुणे), गणेश रत्नाकर भोज (वय ५३, रा. भिमपुरा कॅम्प), दिनेश अरुण खोडके (वय ४९), राजन शंकर कामठे (वय ५८ रा. फुरसुंगी) आणि नितीन हरिभाऊ वाघमारे (वय ५२ वर्षे, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजय सयाजीराव देसाई (वय ५९ वर्षे, रा. अशियाना अपार्टमेंट, सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. २ एप्रिल २०२४ ते १ ऑगस्ट २०२५ दरम्यान सदाशिव पेठ येथे ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अजय देसाई यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तक्रारदार अजय देसाई यांनी २०१८ मध्ये म्हाळुंगे येथील पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एमराल्ड हॉलचे व्यवस्थापन स्वीकारण्याची तयारी दर्शवली. पुढे २०२० पासून त्यांनी हॉल सुरू केला आणि २०२१ मध्ये करार झाला. नंतर २०२२ मध्ये हा करार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवला.

देसाई यांनी स्वतःच्या खर्चातून हॉलचे नूतनीकरण, सजावट व विविध सुविधा उभारल्याने व्यवसायात वाढ झाली. मात्र, नंतर काही पदाधिकाऱ्यांनी भागीदारी, कमिशन आणि रोख रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये वार्षिक २५ लाख रुपये आणि उत्पन्नातील हिस्सा देण्याची अट घालण्यात आली. पैसे न दिल्यास दुसऱ्या केटरर्सला काम देण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा आहे.

60 लाखांची मागणी केली अन्…

एप्रिल २०२४ मध्ये ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी ५ एप्रिल, ६ एप्रिल आणि ७ जुलै २०२४ रोजी मिळून ३७.५० लाख रुपये रोख दिल्याचा दावा केला आहे. या तक्रारीवरून सोसायटीच्या पदाधिकारी व संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Shraddha Walker Death Case : श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Web Title: Extorted 37 lakh from a businessman by threatening him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • crime news
  • Extortion Case
  • pune news

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
1

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
2

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
3

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती
4

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.