Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा

Mumbra Murder, Mumbai Police : खर्डी गावाजवळील जंगल परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे मृतदेहाचे डोके आणि दोन्ही हात गायब होते. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा, याचा कोणताही ठोस पुरावा सुरुवातीला मिळत नव्हता.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 17, 2026 | 11:29 AM
Crime photo (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Crime photo (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

ठाण्यात धक्कादायक घटना…

जंगलात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत 

मृतदेहाचे डोक वेगळं, हात मृतदेहापासून लांब… 

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने नागरिकांना हादरवून सोडले आहे. सुरुवातीला पोलिसांनाही या प्रकरणाचा उलगडा करणे जास्त कठीण झाले होते. कारण हा मृत्यदेह एका सुनसान ठिकाणी सापडलेला होता. मृतदहेहाची अवस्था इतकी भीषण होती की, मृत व्यक्तीची ओळख पटवणे हेच सर्वात मोठे आव्हान बनले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सातत्यारपूर्ण तपासामुळे या गूढ प्रकरणामागचे सत्य अखेर समोर आले.

मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात गायब
खर्डी गावाजवळील जंगल परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे मृतदेहाचे डोके आणि दोन्ही हात गायब होते. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा, याचा कोणताही ठोस पुरावा सुरुवातीला मिळत नव्हता. पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली आणि अनेक तांत्रिक पुरावे गोळा करत तपासाची दिशा निश्चित केली.

पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तर…
तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून तपास केल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. त्यांच्यावर यापूर्वीही किरकोळ गुन्ह्यांचे आरोप होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोघांच्या मनात राग निर्माण झाला. याच रागाचे रूपांतर सूडात झाले आणि त्यांनी मित्राला कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला.

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने…

धारदार शस्त्राने हल्ला…
घटनेच्या रात्री आरोपींनी अमन शेख याला बोलावून रिक्षातून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मृताची ओळख सहज पटू नये, यासाठी त्यांनी डोके आणि दोन्ही हात वेगळे केले. त्यानंतर मृतदेह जंगलात टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट पोलिसांच्या तपासात समोर आली. आरोपींनी हत्येचा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून ठेवला होता. पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त केला असून त्यातील व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या पुराव्यांमुळे तपासाला आणखी बळ मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर मृत अमन शेख याच्यावरही वाहन चोरीसारख्या प्रकरणांची नोंद होती. त्यामुळे या तिघांमध्ये आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. सध्या तपास पथक मृताचे डोके आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार शोधण्याचे प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा गोळा करून न्यायालयात भक्कम आरोपपत्र सादर करण्यासाठी पोलिसांची तपासमोहीम सुरू आहे.

गुरुजी की गुंड? वाई तालुक्यात संतापाची लाट! मुख्याध्यापकाचा महिला शिक्षिकेवर लाकडी दांडक्याने अमानुष हल्ला

मैत्रीनेच केला घात…
या घटनेमुळे मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष इतक्या भयानक शेवटापर्यंत पोहोचेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. मुंब्र्यातील हे हत्याकांड केवळ गुन्हेगारीचे उदाहरण नसून, राग आणि सूडाची भावना माणसाला किती टोकाला नेऊ शकते, याचीही गंभीर आठवण करून देणारी घटना ठरली आहे.

Web Title: Friendship ends in bloodshed police solve shocking mumbra murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर
1

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
2

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…
3

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…
4

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.