काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्चला रात्री पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपण्याच्या तयारीत होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीच्या भावाच्या लक्षात आले की त्याची बहीण खोलीत नाही. त्यांनतर वडिलांनी मुलासह मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा घराच्या अंगात पीडित मुलगी जमिनीवर पडलेली दिसली आणि तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
तरुण भेटायला आला होता मात्र…
मुलीच्या वडिलांनी जेव्हा आपल्या मुलीकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की तरुण शेजारच्या गावातील ओळखीचा असून तिला भेटायला आला होता, मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. पीडितेच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले.
गुन्हा दाखल
पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपी तरुणाला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत
वाशीम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वाशीमच्या रेल्वे स्थानक परिसरातून एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. महिलेचा डोकं मोठया दगडाने ठेवण्यात आला होता, तर महिलेच्या अंगावरचे कपडे अस्ताव्यस्थ होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेहाशेजारी पुरुषाचा बेल्ट खाण्याचे साहित्य मिळाले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं.
Ans: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात.
Ans: बलात्कार आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
Ans: तक्रार मिळताच आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.






