ज्याला हटकले तोच निघाला दुचाकी चोर (फोटो सौजन्य-X)
KDMC Crime News Marathi: कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात दुचाकी चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनेमुळे नागरीक देखील हैराण आहे. दुकान आणि घरासमोर पार्क केलेली दुचाकी अचानक चोरीला जाते. परिणामी कल्याण डोंबिवलीतील नागरीक त्रस्त आहेत. या अनुषंगाने कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित दुचाकी स्वारांची तपासणी सुरु केली आहे.
या तपासणी दरम्यान कल्याणमधील एक तरुण दुचाकीवरून जात असताना दिसला. पोलीस अधिकारी विकास मडके आणि किशोर सूर्यवंशी यांनी त्या तरुणाला थांबविले. तरुणाने त्याचे नाव इम्तीयाज शेख असे सांगितले. तो दूधनाका येथे राहणारा आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. त्यावेळीस त्याच्याकडे गाडीची कादगपत्रे नव्हती. त्याने पोलिसांना उचट सुलट उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने कबूली दिली की तो जी दुचाकी चालवित आहे. ती त्याने चोरी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आणखीन काही दुचाकी त्याने चोरी केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
तसेच काही दिवसांपूर्वी कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या गजानन स्टील इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात शुक्रवारी सकाळी मोठी चोरीची घटना उघडकीस आली. चार अज्ञात चोरट्यांनी कारखान्यातून लाखो रुपये किमतीचे लोखंडी डाय रोल घेऊन पळ काढला. बोलेरो गाडीत २.४० लाख. या प्रकरणी कुणाल गोपीचंद जामनानी यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की चोरटे बोलेरो कारमधून आले आणि त्यांनी शटर तोडून पहाटे ३.४४ ते ४.०५ च्या दरम्यान आत प्रवेश केला. त्याने चोरी अगदी सहजतेने केलीच, शिवाय त्याने कोणतीही भीती किंवा घाईही दाखवली नाही. घटनेच्या वेळी, कोणतीही गस्त नव्हती किंवा कोणताही अडथळा नव्हता, ज्यामुळे चोरांना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही हे स्पष्ट होते. शुक्रवारी कारखाना बंद होता आणि माहिती मिळाल्यानंतर मालक पोहोचला तोपर्यंत सामान गायब झाले होते. या घटनेनंतर स्थानिक उद्योगपती आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.