पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गावात “सिंग बंगल्यावर” बनविभागाने धाड टाकली. या कारवाईत सुखमीत हरमीत सिंग भुतालिया (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्यांचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकार सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आधी जनावरांच्या गोठ्यात बांधले, नंतर केळी, टरबुजाची साली खायला…..; गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना
जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळख पटविण्याकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांबाबत मालकी आणि परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 9 व 51 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मात्र या घटनेने वन विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गुंड गजा मारणेसोबत पोलिसांची ‘मटण पार्टी’
गजानन ऊर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी कोथरूडमधील एका राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. पुढे त्याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली. पुण्यात कुख्यात गुंड गजानन उर्फ गज मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी थेट त्याने मध्यरस्त्यात महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ब्रेकअपनंतर लग्नासाठी मानसिक त्रास, ‘पर्सनल’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल