'इसको अब खत्म कर देंगे...' म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्...
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असतानाच आता नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर येथील पवार पेट्रोल पंपाशेजारील बालाजी ट्रेडर्ससमोर घडली.
याप्रकरणी दानिश आरिफ शेख (वय १८, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शहाबाज उर्फ टिपू शहा (वय ३०, नेहरुनगर, पिंपरी), इर्रशाद शहा (वय ३२, भोसरी), सूरज उर्फ आसिफ शेख (वय २१, नेहरुनगर, पिंपरी) आणि रामा दुर्गाअप्पा चौधरी (वय २५, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या दाजींना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीला पकडून धरले, तर दुसऱ्याने “इसको अब खत्म कर देंगे” असे म्हणत रस्त्याकडेला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोराने मारला. यामध्ये फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूरज आणि रामा या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
कोयत्याने तरूणावर हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे.
कोयत्याने टोलनाक्याची तोडफोड
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तीन जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले असून, दोन जण फरार झाले आहेत.
पाटसमधील टोलनाक्यावर कोयता गॅंगची दहशत; तीन जणांना पाठलाग करून पकडले






