Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नसमारंभातच तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण; ‘तू नवरीचा कोण लागतोस?’ म्हणत बाहेर नेलं अन्…

पंडित नेहरू कॉलेजच्या मागील शाहू गार्डन येथे लग्नसमारंभ सुरू होता. शैलेश कांबळे हे नातेवाईकांच्या लग्नात पाहुण्यांना पंगत वाढण्याचे काम करत होते. त्यावेळी संघपाल व त्याचा एक साथीदार फिर्यादीजवळ आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 11:57 AM
पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : लग्नसमारंभात पाहुण्यांना पंगत वाढणाऱ्या युवकाला दोन जणांनी बेदम मारहाण केली. तुझे नाव पत्रिकेत नाही, मग तू येथे काय करतोस? असा जाब विचारत युवकाला मंडपाबाहेर नेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार वस्तूने मानेवर, छातीवर आणि हातांवर वार करून जखमी केले. ही घटना २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाहू गार्डन परिसरात घडली.

संघपाल जगन जवाळे आणि त्याचा एक साथीदार अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात शैलेश भानुदास कांबळे (वय ३२, रा. गल्ली नं. १४, आनंद नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पंडित नेहरू कॉलेजच्या मागील शाहू गार्डन येथे लग्नसमारंभ सुरू होता. शैलेश कांबळे हे नातेवाईकांच्या लग्नात पाहुण्यांना पंगत वाढण्याचे काम करत होते. त्यावेळी संघपाल व त्याचा एक साथीदार फिर्यादीजवळ आले. त्यातील एकाने गळ्यात हात टाकत त्यांना मंडपाबाहेर नेले. बाहेर नेताच आरोपींनी शैलेश कांबळे यांना तू नवरीचा कोण लागतोस? असा प्रश्न केला.

Solapur Crime : बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड; गच्चीवर झोपलेल्या आईसह दोन मुलांची तलवारीने निर्घृण हत्या

त्यावर कांबळे यांनी नवरीची आई माझी बहीण असून, नवरी माझी भाची आहे. आमचे घरच्यासारखे संबंध आहेत, असे सांगितले. मात्र, आरोपींनी मी घरचा असूनही माझे नाव पत्रिकेत नाही, मग तू येथे जेवण कसे वाढतोस? असे म्हणत वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यावर ज्याच्या घरचे लग्न आहे, त्यांना विचार मला कशाला शिव्या देतो, असे म्हणाले. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी शैलेश कांबळे यांना मारहाण केली. या मारहाणीत शैलेश हे जखमी झाले आहेत.

बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड

दुसरीकडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Youth assaulted at a wedding ceremony incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Beaten Case
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
1

Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार
2

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप
4

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.