Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटी-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

वीर अनिल शिंदे याचा वाढदिवस रविवारीच साजरा झाला होता आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसात काळाने त्याच्यावर झडप घातली. वीर, तेजस आणि साहिल हे तिघेही मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 02:42 PM
वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटी-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटी-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

मंचर : पुणे-नाशिक जुन्या महामार्गावरील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक वीर अनिल शिंदे (वय १७, रा. अवसरी खुर्द ता.आंबेगाव) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे विद्यार्थी तेजस महेश भालेराव आणि साहिल संदीप टेमकर दोघेही (रा. अवसरी खुर्द) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नरहून पुण्याकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस जुन्नर-कुर्ला नेहरूनगर बस महात्मा गांधी विद्यालयाजवळ मंचरच्या दिशेने आली असता, समोर पायी चाललेल्या शालेय विद्यार्थिनींना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचालक वीर अनिल शिंदे याचा ताबा सुटला. दुचाकी घसरून बसच्या मागील डाव्या चाकाखाली गेल्याने अपघात झाला. त्यामध्ये दुचाकी चालक वीर अनिल शिंदे हा एसटीच्या मागील चाकाखाली आला. अपघातानंतर बसचालकाने बस थांबवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वीर अनिल शिंदे याचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, वीर अनिल शिंदे याचा वाढदिवस रविवारीच साजरा झाला होता आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसात काळाने त्याच्यावर झडप घातली. वीर, तेजस आणि साहिल हे तिघेही मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावीत नुकताच प्रवेश घेतला होता.

कॉलेजच्या चौथ्याच दिवशी अपघात

कॉलेजचा अवघा चौथाच दिवस असताना घडलेल्या या दुर्घटनेने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, एसटी चालक गणेश सुधाकर गेडाम यांनी फिर्याद दिली आहे.

जेजुरीतही भीषण अपघात

जेजुरीत सोमवारी भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसान भरपाईची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. सरकारने पीडित कुटुंबांसाठी आर्थिक मदतीचीही घोषणा केली आहे.

मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय…! प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या, अखेर भयानक मर्डर मिस्ट्रीचा ‘असा’ झाला उलगडा

Web Title: Youth dies in st bus two wheeler accident incident in manchar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Accident Case
  • Manchar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.