आणखी एक युट्यूबर ज्योती मल्होत्राचा मित्र देशद्रोही निघाला (फोटो सौजन्य-X)
Jyoti Malhotra News: यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं जाळं उघडं पडलं आहे. आतापर्यंत तपास संस्थानी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्योती मल्होत्राची मात्र सध्या चांगलीच चर्चा रंगली असताना आता आणखी एक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे, ज्योती मल्होत्रा प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हेरगिरीच्या संशयावरून आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. त्याचे ज्योतीशीही संबंध असून तो पाकिस्तानच्या अनेक एजंटांना भेटला आहे. ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून सोशल मीडियाच्या अनेक मोठ्या चेहऱ्यांना अटक केली आहे.
एका वृत्तपेपरला दिलेल्या माहितीनुसार मोहालीतील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलने रूपनगर जिल्ह्यातील महालन गावातील जसबीर सिंगला अटक केली आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी माहिती दिली आहे की, तो जान महल नावाचा युट्यूब चॅनल चालवतो. त्यांनी सांगितले की त्याचे देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. तपासात असे दिसून आले आहे की जसबीर पाकिस्तानी एजंट शाकीर उर्फ जाट रंधावाशी संबंधित होता. याशिवाय तो हरियाणातील रहिवासी असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या नियमित संपर्कात होता. ज्योतीला पोलिसांनी हेरगिरीच्या संशयावरून अटक केली आहे.
पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, जसबीर पाकिस्तान उच्चायोगातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होता. यापूर्वी दानिश आणि ज्योती यांच्यात सतत संपर्कात आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारताने बाहेरचा रस्ता दाखवला होता.
अहवालानुसार पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे की जसबीर दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी झाला होता. तो गुप्तचर कार्यात गुंतलेल्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना आणि व्लॉगरना भेटल्याचा आरोप आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, सिंग २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानलाही गेला होता. त्याने सांगितले की त्याचे डिव्हाइस देखील जप्त करण्यात आले आहे आणि त्यात पाकिस्तानचे अनेक संपर्क सापडले आहेत. ज्योतीच्या अटकेनंतर जसबीरने त्यांच्या संभाषणांचे रेकॉर्ड मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ओळख टाळण्यासाठी जसबीरने या पीआयओंशी असलेल्या त्याच्या संपर्काचे सर्व ट्रेस पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध एसएसओसी मोहाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.