इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून दोन गटांत राडा; तीनजण गंभीर, 18 जणांना अटक
इचलकरंजी : जुना वाद उफळून येऊन दोन गटात राडा झाला. या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुशांत अर्जुन रानमाळे (वय २५ रा. इंदिरा कॉलनी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन 22 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ५ दुचाकी जप्त केल्या असून, १८ जणांना अटक केली आहे.
नौशाद करीम मुजावर (वय २४ रा. स्वामी अपार्टमेंट), सागर अमर शिकलगार (वय २० रा. शिकलगार वसाहत), आयुब अहमद अत्तार (वय २२ रा. केटकाळेनगर) हे तिघे रात्रीच्या सुमारास सुर्योदयनगर येथे बसले होते. त्याठिकाणी प्रज्वल अशोक हळदकर (वय 22), युवराज मच्छिंद्र जाधव (वय २९), अमरनाथ मच्छिंद्र जाधव (वय २१) यांच्यासह दुचाकीवरुन आलेल्या 22 जणांनी जुन्या वादातून तिघांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेदेखील वाचा : Maharashtra ATS raid in Borivali: स्लीपर सेल, कट्टरपंथी नेटवर्क….; महाराष्ट्र ATSची बोरिवलीत छापेमारी
यावेळी प्रशांत दिलीप कुऱ्हाडे (वय ३२) याने आयुब अत्तार याच्या पाठीत धारधार चाकूने वार केला. तर प्रज्वल हळदकर, अमरनाथ जाधव यांच्यासह आलेल्या इतरांनी लाकडी दांडक्याने नौशाद मुजावर याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी सुशांत रानमाळे याच्या फिर्यादीनुसार २ अल्पवयीन मुलांसह २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
त्यापैकी प्रज्वल हळदकर, युवराज जाधव, अमरनाथ जाधव, अनिल कासाप्पा कल्याणी (वय २५), उत्कर्ष विजय पाटील (वय २४), चंद्रदिप किरण झुटाळ (वय २०), अतुल नामदेव मोहिते (वय २४), वेदांत दिलीप पोळ (वय २२), युवराज हिंदुराव साठे (वय ३८), शिवम सुरेश कांबळे (वय ३०), पुंडलिक वामन बकरे (वय २५), गणेश शिवानंद मोळे (वय २४), जयंत अजित कांबळे (वय २५), दुर्वांकर जयंत खारकांडे (वय २२), साहिल सुनिल शेवाळे (वय २२), आकाश प्रकाश कांबळे (वय ३१), राजवर्धन सुरेश धामके (वय २०) या १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयितांकडून ५ दुचाकी जप्त
संशयितांकडून ५ दुचाकी जप्त केल्या असून, गुन्ह्यातील योगेश कारवे आणि मंगेश खांडेकर यांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या १८ जणांना न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.