Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray vs Shinde: कोल्हापूरात होणार राडा? मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंची शिवसेना आजपासून प्रचाराचा करणार शुभारंभ

राजकीय पक्षांकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून आज (5 नोव्हेंबर) दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन जाहीर सभा घेणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2024 | 10:40 AM
मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंची शिवसेना आजपासून प्रचाराचा करणार शुभारंभ (फोटो सौजन्य-X)

मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंची शिवसेना आजपासून प्रचाराचा करणार शुभारंभ (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणुकीला अवघे 15 दिवस उरले आहेत.  अशातच पक्षांकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आजपासून (5 नोव्हेंबर) रिंगणात उतरणार आहेत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराला सुरुवात करत असून या माध्यमातून कोकण आणि विदर्भातील जागा जिंकण्याची रणनीती मानली जात आहे.

2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा मतदारसंघ उद्धव यांच्या अजेंड्यावर आहे. आता दोन वर्षांनंतर उद्धव यांनी थेट त्यांच्याच भागात रॅली काढून स्कोर सेट करण्याचा डाव आखला आहे. याचदरम्यान आता दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन जाहीर सभा घेणार आहेत. एकंदरित पाहता कोल्हापूरात आज राडा होणार की काय? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा: “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा…”, उद्धव ठाकरेंची ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराचा शुभारं करवीर निवसिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

याच दिवशी कोल्हापूर शिवसेनेच्या गटांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज (५ नोव्हेंबरला) कोल्हापुरात प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी नरळ फोडून जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे आज कोल्हापुरात राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्या स्थिनीनंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक सभा असणार आहे. अँजिओप्लास्टीनंतर त्यांनी मातोश्रीवर विश्रांती घेतली होती. परंतु आता ते कोल्हापुरात प्रचारात सहभाग होतील. कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यात काही माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दुसरीकडे तपोवन मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. कोल्हापूर प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील यांनी काही सकारात्मक कायदा आणला असता. त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण कमालीचे तापलेले आहे.

प्रत्येक जागेवर चुरशीची लढत

भायखळा, माहीम, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर, अंधेरी पूर्व, भांडुप, शिवरी, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही निर्णायक लढाई, अस्तित्वाची लढाई आणि खरी शिवसेना कोण हे ठरवण्याची लढाई अपेक्षित आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून शिंदे छावणीतील नेत्यांना खुले आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. अशा परिस्थितीत चेकमेटच्या खेळात कोण कोणावर मात करतो हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा: संजय राऊत यांच्या भावाच्या विरोधात FIR दाखल,शिंदेंसेनेच्या उमेदवाराबद्दलचं वक्तव्य भोवलं!

Web Title: Cm eknath shinde and uddhav thackeray shiv sena to launch campaign from kolhapur today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kolhapur
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
3

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
4

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.