मंत्रिपद नाकारलं, आमदाराने थेट राजीनामाच दिला; शिंदेंच्या शिवसनेनेला मोठा धक्का
मुंबई : अखेर आज (दि.05) महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. निकालाच्या बारा दिवसांनंतर अखेर महायुतीने सत्तास्थापनेचा दावा करुन सरकार स्थापन करणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला येणार आहेत.
महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याची मुंबईमध्ये आणि आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. आज होणार शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ तीन नेते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे कोणत्या पदाची शपथ घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत महायुतीच्या बड्या नेत्याने वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबतचं पत्र थोड्याच वेळात राजभवनवर जाणार आहे. तर याबाबतची माहिती शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील थोड्या वेळापूर्वी दिली होती. त्यामुळे आता अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीच्या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याला देशातील आणि राज्यातील अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये विरोधी नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र यावर टीका करण्यात येत आहे. यावर रामदास आठवले म्हणाले आहेत की, “आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा बोलवू. त्यामुळे संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलावलं आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते, तर त्यांचा मान-सन्मान आणखी वाढला असता. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली”, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
एनडीए सरकारमध्ये सामील झालेले रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “मी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, असे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, असे शाहांनी मला सांगितले आहे. माझं याबद्दल शाहांशी बोलणं झालं आहे. यावेळी मी त्यांच्याकडे आम्हाला सुद्धा एक आमदार आणि मंत्रीपद हवं आहे, अशी मागणी केली आहे”, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
रामदास आठवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.