महाराष्ट्र
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकीची मतमोजणी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. पण आता सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आता कल यायला सुरुवात झाली आहे.
महायुती आघाडीत भारतीय जनता पक्षाने 149 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले होते, शिवसेनेने 81 जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. विरोधी MVA आघाडीमध्ये, काँग्रेसने 101 उमेदवार, शिवसेना (उबाठा) 95 आणि राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) 86 उमेदवार उभे केले. बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) सारख्या पक्षांनीही निवडणूक लढवली, ज्यामध्ये बसपने 237 उमेदवार उभे केले आणि एआयएमआयएमने 17 उमेदवार उभे केले.
बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवार कुटुंबात रंगलेल्या हायव्होल्टेज लढतीत काका-पुतण्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पोस्ट मतमोजणीत युगेंद्र पवारांनी बाजी मारलेली. तर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम मतमोजणीत सध्या अजित पवारांनी बाजी मारली आहे. तर, युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. येत्या काही तासांतच बारामतीचा निकाल स्पष्ट होईल.
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होत आहे. पहिल्या पोस्टल मतमोजणीमध्ये शरद पवार गटाचे युगेंद्र पवार हे आघाडीवर होते. पण आता ईव्हीएम मशीनचे मतमोजणी सुरु झाली असून अजित पवार यांनी आता बाजी मारली आहे. बारामतीमध्ये सध्या अजित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बारामतीचा गड कोण राखणार याची उत्सुकता लागली आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत
माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये सदा सरवणकर यांच्यासमोर पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेल्या अमित ठाकरे यांचे आव्हान होते. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यामध्ये अमित ठाकरे यांनी बाजी मारली आहे. नवीन नेतृत्व म्हणून अमित ठाकरे सध्या समोर येत असून ते सध्या आघाडीवर आहेत.