Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Of Maharashtra : ‘युज ॲन्ड थ्रो’ ही भाजपची पॉलिसी, ते शब्द पाळत नाहीत…; मुख्यमंत्रिपदावरुन संजय राऊतांचा घणाघात

विधानसभा निवडणुकीचा एकतर्फी निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 27, 2024 | 11:06 AM
sanjay raut target bjp for cm of maharashtra

sanjay raut target bjp for cm of maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली असली तरी राजकारण रंगलेले आहे. निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला आहे. ऐतिहासिक निकाल मिळवल्यानंतर देखील महायुतीने अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन केलेले नाही. यामुळे आता शिंदे गट व भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. यावरुन आता महाविकास आघाडीचे नेते व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपची पॉलिसी ही ‘युज ॲन्ड थ्रो’ अशीच आहे. भाजप कधीच दिलेला शब्द पाळत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यामध्ये विधानसभेचे मुदत उलटून गेल्यानंतर देखील दुसरे सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे महाविकास आघाडीने महायुतीला घेरले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची ही प्रवृत्ती असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “तीन पक्षांच्या या महायुतीला सैतानी बहुमत मिळाले आहे. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा आणि छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे,” असा घणाघात संजय राऊत म्हणाले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरुन देखील राऊतांनी निशाणा साधला. खासदार संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीचे जे शूरवीर आहेत, भाजपचे नेतृत्व, त्यांनी डोळे वटारले की आत्तापर्यंत सगळे गप्प बसत होते. पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बंडखोर, जी भुतं निर्माण केलीत ती आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी आणि शहानांच आव्हान देत आहेत असंही दिसतंय. भाजपाला पाशवी यश मिळालं आहे. असं पाशवी यश देशाला आणि राज्याला घातक असतं. यामुळे भ्रष्टाचार वाढतो, हुकूमशाही वाढते,” असे मत संजय राऊत यांनी मांडले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

2019मध्ये ठाकरे गटामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाले होते. आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपची हीच प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, “भाजपाची भूमिका ही गरज सरो आणि वैद्य मरो किंवा वापरा आणि फेका अशी आहे त्यामुळे त्यांनी काय शब्द दिला असेल तो काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्याचा सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला भोगावा लागला आहे. शब्द पाळणं हे भाजपाला मान्य नाही ते कधीही शब्द पाळत नाहीत. ती नैतिकता भाजपाकडे उरलेली नाही. पक्ष फोडण्यासाठी एखाद्याची गरज असते तेव्हा आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात. त्यानंतर काम झालं की त्या व्यक्तीला लाथा घालतात हे महाराष्ट्राला दिसलं आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Shivsena sanjay raut target bjp for not following there words of cm of maharashtra election result 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut

संबंधित बातम्या

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा
1

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज
2

Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज

Ladki Bahin Yojana  : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…
3

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…

Narayan Rane : …तर आम्ही संबंध तोडू; नारायण राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा
4

Narayan Rane : …तर आम्ही संबंध तोडू; नारायण राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.