Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”30-40 पोरं मारहाण करण्यासाठी…”, मराठी अभिनेत्यावर टोळक्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न,पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 31, 2026 | 09:52 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली आहे. अंकुर वाढवेने शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.यवतमाळमधील पुसद या गावी त्याच्यावर ते ३० लोकांच्या टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी फेसबुक पोस्ट अंकुरने शेअर केली आहे. यापोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेबद्दल अंकुरने सविस्तरपणे पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

अंकुरने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ” पुसदमध्ये काल माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने मिटलं आहे. पण, यावरून लक्षात येतं की पुसद मध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे. ”

अंकुरने सविस्तरपणे सांगितले प्रकार

आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांकडून विचारपूस होत असल्याने आपण लाइव्ह येत असल्याचे अंकुर वाढवेने सांगितले. यावेळी त्याने आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्ट केले.

अंकुर म्हणाला, ”नमस्कार! मला काहीही झालं नाहीये, मी सुखरूप आहे. पुसदमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. माझे काही मित्र त्या चित्रपटासाठी प्रोडक्शनचं काम करत होते. ज्यावेळी त्यांना समजलं की, मी सुद्धा पुसदमध्ये आहे… त्यावेळी ते मला घरी भेटण्यासाठी आहे. माझ्या मित्रांसोबत काहीजण असेही होते ज्यांनी दारू प्यायली होती. त्यांनी आमच्या शेजारच्या घरांवर मद्यप्राशन करून लघुशंका केली. मग त्या लोकांनी मला फोन केला की, तुमचे पाहुणे आमच्या दारावर असा- असा प्रकार करत आहेत. त्यानंतर मी आणि माझ्या भावाने त्या लोकांना परत पाठवले, आणि मित्रालाही पाठवून दिले.”

अंकुरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या घरी आलेल्या काही पाहुण्यांपैकी एका व्यक्तीची चूक असल्याने वाद निर्माण झाला. संबंधित व्यक्ती निघून गेल्यानंतर तोच युवक पुन्हा ३० ते ४० जणांना घेऊन परत आला. हे सर्वजण मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचा दावा अंकुरने केला आहे. मात्र, उपस्थितांपैकी काहींनी त्याला ओळखल्याने परिस्थिती आणखी बिघडली नाही आणि पुढे वाद मिटला.

बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका: एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विचार करताना सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाल्याचे अंकुर ने सांगितले. “माझ्याकडे ३०-४० जण येऊ शकतात, तर सामान्य लोकांची काय अवस्था होत असेल? एका फोनवर इतक्या मोठ्या संख्येने लोक मारहाण करण्यासाठी येत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे त्याने म्हटले.

चिन्मय मांडलेकर करणार ‘या’ आगामी मालिकेचे लेखन! मराठी अस्मितेसाठी एकत्र, लेखक-दिग्दर्शकाची ‘ही’ सुप्रसिद्ध जोडी

दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मार्गी लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अशा प्रवृत्तीच्या गावगुंडांना योग्य समज देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्याने केली. “याच कारणासाठी मी हा व्हिडिओ शेअर केला. बाकी मी पूर्णपणे सुखरूप आहे,” असेही अंकुरने स्पष्ट केले.

Web Title: A life threatening attack was allegedly attempted on ankur wadhave best known for chala hawa yeu dya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Attack
  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
1

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
2

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
3

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
4

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.