Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

‘घबाडकुंड’च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय साकारण्याची तयारी सुरू झाली आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 22, 2026 | 05:38 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत आशय, तंत्रज्ञान आणि सादरीकरणाच्या बाबतीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता या बदलांना आणखी वेग देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ ही संकल्पना प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे मांडणाऱ्या ‘घबाडकुंड’ चित्रपटानंतर आता मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय साकारण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली आहे.

‘घबाडकुंड’ने मराठी सिनेमात एक वेगळी दिशा निर्माण केली. स्वतंत्र कथानकांच्या पलीकडे जाऊन परस्परांशी जोडलेल्या कथाविश्वाची संकल्पना मराठी प्रेक्षकांनी स्वीकारल्याने निर्मात्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याच यशाच्या जोरावर आता अधिक मोठ्या प्रमाणात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दुसरा अध्याय साकारला जाणार आहे.

निर्माते डॉ. रसिक कदम यांच्या मते, मराठी चित्रपटसृष्टीला केवळ यशस्वी चित्रपट नव्हे, तर दीर्घकालीन सिनेमॅटिक फ्रँचायझींची गरज आहे. जागतिक स्तरावरील चित्रपटविश्वाप्रमाणे मराठीतही एक भक्कम आणि सातत्यपूर्ण युनिव्हर्स उभं करण्याचं ध्येय या प्रकल्पामागे आहे. ५० कोटी रुपयांची गुंतवणूक ही केवळ आर्थिक बाब नसून मराठी सिनेमाच्या भविष्यातील शक्यतांवर ठेवलेला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

या नव्या अध्यायात नेमकं काय पाहायला मिळणार, कोणते कलाकार झळकणार आणि कथानकाची दिशा काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक, रोमांचक आणि जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने उभारला जाणारा हा प्रकल्प आगामी काळात उद्योगक्षेत्रासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. ‘घबाडकुंड’ने सुरू केलेला प्रवास आता अधिक मोठ्या कॅनव्हासवर पोहोचणार असून, मराठी युनिव्हर्सचा हा दुसरा अध्याय सिनेसृष्टीसाठी नवा मैलाचा दगड ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Marathi Boy Viral Video: ‘इंडियाज गॉट लेटंट 2’मध्ये छाप पाडणारा हा मराठी मुलगा कोण? आलिया भट्टही झाली फॅन, समय रैना झाला निःशब्द

Web Title: A new chapter in marathi cinema after ghabadkund marathi universe expands with a 50 crore investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर
1

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री
3

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस
4

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.