
Akanksha Puri On CJP Protest News (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
आकांक्षाने आंदोलनाबाबत बोलताना एक गंभीर आरोप केला आहे. तिने केलेल्या आरोपानुसार, काही लोक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर स्वत:ची प्रसिद्धी वाढण्यासाठी या विषयाचा वापर करत आहेत. एवढचं नाहीतर, तर काही कलाकारांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी पैशाची ऑफरही देण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. आकांक्षाच्या या विधानामुळे सोशलमीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ANI ला दिलेला मुलाखतीमध्ये आकांक्षा म्हणाली की, “विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा वापर कोणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी होऊ नये. हा विषय खूप संवेदनशील आहे. त्यामुळे याकडे प्रसिद्धीचं साधन म्हणून पाहणं चुकीचं असल्याचं तिने स्पष्ट केलं. तिच्या मते, योग्य कारणासाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे, पण त्यामागे स्वार्थ नसावा. अनेक लोक आणि काही गटांकडून संपर्क केला जात आहे. आंदोलनात सहभागी व्हा, कार्यक्रमात या किंवा सार्वजनिक पाठिंबा द्या, अशा प्रकारच्या ऑफर कलाकारांना मिळत असल्याचं तिने सांगितलं. मात्र, अशा कोणत्याही गोष्टीचा भाग होण्याची तिची इच्छा नसल्याचं तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं.”
ती म्हणाली की, “या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांनाच सहन करावा लागत आहे. महिनोन्महिने अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा घटना खूप वेदनादायक असतात. त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही प्रत्येक संबंधित यंत्रणेची जबाबदारी असल्याचं तिने म्हटलं.”
तिच्या मते, विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या अवास्तव नाहीत. त्यांना केवळ पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि न्याय हवा आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही विषय हलक्यात घेता कामा नये, असंही ती म्हणाली.
दरम्यान, आकांक्षा पुरीच्या या वक्तव्यानंतर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. काहींनी तिच्या मताला समर्थन देत, आंदोलनाचा वापर प्रसिद्धीसाठी होऊ नये असं मत व्यक्त केलं. तर काहींनी तिच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत, त्यासाठी पुरावे असल्यास ते समोर आणावेत अशी मागणी केली. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.