सौजन्य - नवराष्ट्र टीम
‘तुम मेरे हो’ हा चित्रपट आकाश आणि तमन्ना यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. अभिनेता गुरमीत चौधरी हा चित्रपटात आकाशची भूमिका साकारत असून, अभिनेत्री ईशा मालवीय तमन्नाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या नात्यातील प्रेम, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत चित्रपटाच्या कथानकातून उलगडणार आहे.
प्रेमकथेतील संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत
चित्रपटात आकाश आणि तमन्ना यांच्या नात्याची सुरुवातच अनेक आव्हानांनी भरलेली आहे. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात अनपेक्षित अडचणी, भावनिक चढ-उतार आणि कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो. या सर्व परिस्थितींवर मात करून त्यांचे प्रेम टिकून राहणार का, त्यांच्या नात्याला सुखद शेवट मिळणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष पांडा यांनी केले आहे. प्रेमकथेच्या माध्यमातून नात्यांमधील भावना, संघर्ष आणि एकमेकांवरील विश्वास यांचे चित्रण करण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.
दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
पुणे दौऱ्यादरम्यान ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली. आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. चित्रपटाच्या प्रमोशनची संपूर्ण जबाबदारी फ्रीकआऊट एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आकर्षण कटियार यांनी सांभाळली आहे. पुण्यातील या प्रमोशनल भेटीमुळे ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
Ans: अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता गुरमीत चौधरी हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते.
Ans: दोन्ही कलाकारांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
Ans: हा चित्रपट आकाश आणि तमन्ना यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यांच्या नात्यातील संघर्ष, भावनिक चढ-उतार आणि प्रेम टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यात पाहायला मिळणार आहे.






